maharashtra

पुसेगावातील श्वान शर्यतीला उस्फुर्त प्रतिसाद


Immediate response to the dog race in Pusegaon
पुसेगाव, ता. खटाव येथे विकास जाधव व गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्वान शर्यतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यती बंद असल्याने या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.

पुसेगाव : पुसेगाव, ता. खटाव येथे विकास जाधव व गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्वान शर्यतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यती बंद असल्याने या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.
पुसेगाव, ता. खटाव येथील शासकीय विद्यानिकेतन च्या परिसरात झालेल्या या स्पर्धेत मादी गटात सुमारे ८१ तर नर गटात ७६ श्वानांनी सहभाग नोंदवला. यात पंढरपूर, आटपाडी, माळशिरस, बारामती, मोही मार्डी, वारणा कापसी, कराड, नातेपुते तसेच खटाव, माण, कोरेगाव, सातारा, फलटण, कराड तालुक्यातील शौकिनानी श्वानासह हजेरी लावली. गेल्या आठ-दहा वर्षांपासून बैलगाड्या च्या शर्यतीवर शासनाने बंदी घातली असल्याने श्वान शर्यतीना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने शर्यतीच्या आधल्या दिवशी श्वानांची धावपट्टी पावसाने भिजून खराब होऊ नये म्हणून संयोजकांनी त्यावर प्लास्टिक कागद अंथरून योग्य ती काळजी घेतली होती.
या शर्यतीत ७७ फेरे झाले, या शर्यती यशस्वी होण्यासाठी रत्नदिप मंडळ व जय हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.