maharashtra

पुसेगावात शॉर्टसर्किटने पेटली गाडी

सुदैवाने जिवितहानी नाही

A car caught fire due to short circuit in Pusegaon
निढळ, ता. खटाव येथील रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने शेजारील रहिवाश्याने त्यांच्या कडील चारचाकीतून त्या व्यक्तिला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी एक च्या सुमारास आणले. रुग्ण दवाखान्यात गेल्यावर गाडी वळवताना इंजिनजवळील बॅटरीजवळ शॉर्टसर्किट होऊन गॅस किट असलेल्या गाडीने पेट घेतला. या आगीत चारचाकी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

पुसेगाव :  निढळ, ता. खटाव येथील रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने शेजारील रहिवाश्याने त्यांच्या कडील चारचाकीतून त्या व्यक्तिला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी एक च्या सुमारास आणले. रुग्ण दवाखान्यात गेल्यावर गाडी वळवताना इंजिनजवळील बॅटरीजवळ शॉर्टसर्किट होऊन गॅस किट असलेल्या गाडीने पेट घेतला. या आगीत चारचाकी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
रविवारी दुपारी पुसेगाव येथील भवानीनगर परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात निढळ येथील रुग्णाला घेऊन आलेल्या गाडीने पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली. मात्र तात्काळ पुसेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनिल अब्दागिरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परीस्थितीचे भान राखत योग्य ती उपाययोजना केली. मारुती 800 ही चारचाकी गाडी त्या आगीत जळून खाक झाली. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.