पुसेगाव, ता खटाव येथे मरीआई मंदिराजवळ काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी दोन लाख पंचान्नव हजार नऊशे रुपयांची जबरी चोरी करून संजय तोडकर यांना लोखंडी सळई, लाडकी दांडके, सुरा यांनी मारहाण करून पोबारा केला.
पुसेगाव : पुसेगाव, ता खटाव येथे मरीआई मंदिराजवळ काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी दोन लाख पंचान्नव हजार नऊशे रुपयांची जबरी चोरी करून संजय तोडकर यांना लोखंडी सळई, लाडकी दांडके, सुरा यांनी मारहाण करून पोबारा केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुसेगाव येथील मरीमाई मंदिराजवळ सौ रेखा संजय तोडकर यांचे घर असून काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे मणी मंगळसुत्र, पट्टी टाईप सोन्याचे गंठण, सोन्याची चैन, कानातील सोन्याच्या रिंगा, दोन झुबे, चांदीचे पैंजण व रोख रक्कम असे मिळून २ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादीच्या पतीनी विरोध केला असता संजय तोडकर यांना मारहाण केली आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली असून पुढील तपास पीएसआय लोंढे करीत आहेत.