पुसेगाव, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी संपूर्ण गावामध्ये "निर्जंतुकीकरण मोहीम" राबविण्यात आली. श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी करून हे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
खटाव : पुसेगाव, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी संपूर्ण गावामध्ये "निर्जंतुकीकरण मोहीम" राबविण्यात आली. श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी करून हे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने किटकजन्य आजारांपासून संरक्षणासाठी डेंगू, हिवताप आणि साथीच्या आजारांची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली. सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव व सदस्यांच्या पुढाकाराने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा हिवताप कार्यालय सातारा यांच्या माध्यमातून ही औषध फवारणी करण्यात आली.
दरम्यान, पुसेगाव यात्रेत येणाऱ्या भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपसरपंच पृथ्वीराज जाधव यांनी केले आहे.