पाचगणी पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जनजागृती स्पर्धेमध्ये युवासेनेचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष नितीन भिलारे दिग्दर्शित ‘कोविड योद्धा’ या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले. कोरोना महामारीच्या काळात लोकांची सेवा करणार्या योद्ध्यांचे मनोबल वाढावे यासाठी
आगामी शिवजयंती, यात्रा, उत्सव शांततेत पार पडावेत. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांतर्फे देण्यात आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे. यासाठी पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत आज पाचगणी पोलिसांनी जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम राबवली.
महाबळेश्वर-पाचगणी राज्यमार्गावरील भिलार वॉटर फॉल नजीकच्या डोंगररांगेमध्ये शुक्रवारी सकाळी वणवा लागला. वार्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली.
महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी वेण्णालेक नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिला किरकोळ तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश भगवान राजाणे (रा. रुपवली (गोलेकोंड) ता. महाड) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नानासो लक्ष्मण इंगळे (वय 40, रा. देऊळगावसिद्धीकी, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी-महाबळेश्वर सज्ज झाले असून, नाताळ सणानिमित्त सलग जोडून सुट्या आल्याने दोन्ही गिरिस्थाने पर्यटकांनी बहरली आहेत. विविध पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू असल्यामुळे अनेकांनी या गिरिस्थानावर सुट्टीचा आनंद एन्जॉय करण्यावर भर दिला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून, दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याचबरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोक न्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला साधता येते. त्यामुळे लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत,’ असे अवाहन तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायाधीश शैलेश कंठे यांनी केले.
कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेली सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाचगणी शहरातील बहुतांशी लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असल्याने पॉइंटवरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी टेबललँड व्यापारी असोसिएशनच्यावतीने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली,’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची झाली असून, त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे, असा प्रतिटोला नगरसेवक कुमार शिंदे ऑनलाइन सभेस विरोध केलेल्या ‘त्या’ बारा नगरसेवकांना लगावला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून, अजूनही लोकांना कोरोनाची भीती व गांभीर्य नसल्या कारणामुळे काहीजण मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशा लोकांवर पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार व सहकार्यांनी अचानकपणे पाचगणी बाजारपेठ, बसस्थानक, शॉपिंग सेंटर परिसरात मोहीम राबवून जनतेमध्ये मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, गाडीत एकापेक्षा जास्त व्यक्ती असताना मास्क न वापरणे, दुकानात ग्राहकांनी एकमेकांमध्ये 6 फुटांपेक्