कोरोनाच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करून करण्यात आली. या वेळी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकार्यांनी केले.
पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात येत्या 15 दिवसांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, अन्यथा प्रशासनास आंदोलनास सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे निवेदन महाबळेश्वर येथील ‘मनसे विद्यार्थी सेने’च्यावतीने तहसीलदार सुषमा पाटील व पालिका प्रशासनास देण्यात आले आहे.
जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर यांच्यातर्फे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर साहित्याचे वितरण ग्रामपंचायत खिंगर व भिलार येथे करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली असून, आज पाचगणी पोलिसांनी मास्क न घालता फिरणार्या नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांच्या गर्दीमुळे पाचगणी शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 494 झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील पंचायत समितीमधील एका अधिकार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून पंचायत समिती इमारतीमध्ये औषध फवारणी करून ती दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी 26 तर बुधवारी 10 अशा एकूण 36 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 494 वर पोहोचली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.
पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही वाद्यांचा निनाद न करता शांततेने आणि उत्साहात घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.