लॉकडाऊन आणखी कडक
किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्यपदार्थ दुकाने बंद 10 मे पर्यंत राहणार बंद
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने व कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. त्यानुसार प्र. जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दि. 04 रोजीच्या 7 वाजल्यापासून ते दि. 10 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असून या सेवा फक्त घरपोच देण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने व कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. त्यानुसार प्र. जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दि. 04 रोजीच्या 7 वाजल्यापासून ते दि. 10 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असून या सेवा फक्त घरपोच देण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
जिल्हा प्रशासनाने जारी केलेली नियमावली खालीलप्रमाणे अशी :
सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणार्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.
कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील.
हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादय पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना दि. 14 एप्रिल 21 रोजीचे आदेश लागू राहतील.
घरपोच मद्य विक्री बाबत दि. 20/04/2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 असा बदल करणेत येत असून या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच भारतीय साथरोग अधिनियम नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.