lockdown

esahas.com

राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, निर्बंध कठोर होणार

राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय झालाय.

esahas.com

लॉकडाऊन आणखी कडक

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने व कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. त्यानुसार प्र. जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दि. 04 रोजीच्या 7 वाजल्यापासून ते दि. 10 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असून या सेवा फक्त घरपोच देण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

esahas.com

खणआळीतील तीन कापड व्यवसायिकांवर गुन्हा 

सध्या लॉकडाऊन असूनही जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला हरताळ फासत खणआळीतील काही कापड व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.

esahas.com

कोरेगावात मुख्याधिकार्‍यांची धडक कारवाई

कुमठे : कोरेगाव शहराची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी गुरुवारी शहरातील दोन चिकन सेंटर्ससह एका देशी दारू दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारत पाच दिवसांसाठी ही दुकाने सील केली आहेत. राज्य शासनाने कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहे...

esahas.com

दहिवडीत आणखी दहा दिवस लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसांचा लॉकडाऊन पाळण्यात आला. आज मुदत संपताच पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

esahas.com

लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे

पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

esahas.com

‘हिंगणगाव’च्या अनिकेतचा लॉकडाऊन काळात गरजूंना मदतीचा हात..!

जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. दरम्यानच्या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण समाजात अशी काही माणसं असतात की, ज्यांच्यात समाजाप्रती काहीतरी नवं करून दाखवण्याची तळमळ असते. अशाच एका तरुण ‘कोरोना योद्ध्या’नं लॉकडाऊन काळात मुंबई माण खुर्द शिवाजीनगर येथील गरीब-गरजूंना मदतीचा हात अन् मायेची ऊब देऊन समाज

esahas.com

लॉकडाऊनमुळे साखरवाडी विद्यालयाचा परिसर सुनासुना

कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यातल्या शाळांना सुट्या आहेत. सध्या विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातल्या शाळा ओस पडल्या असून, येथे कोणीही फिरकत नसल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सध्या शांततेचे वातावरण तयार झाले आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची नेहमीच शाळेमध्ये वर्दळ होती, ती पूर्णपणे या कोरोना महामारीमुळे थांबली आहे.

esahas.com

नागरिकांची लॉकडाऊन काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी 

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. काम नसल्याने खिशात पैसे नाहीत. अशा परिस्थितीत पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातल्या नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी, पाणी पट्टी माफ करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.