लॉकडाऊनमुळे साखरवाडी विद्यालयाचा परिसर सुनासुना

मुलं घरातूनच घेताहेत ऑनलाइन शिक्षण 

कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यातल्या शाळांना सुट्या आहेत. सध्या विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातल्या शाळा ओस पडल्या असून, येथे कोणीही फिरकत नसल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सध्या शांततेचे वातावरण तयार झाले आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची नेहमीच शाळेमध्ये वर्दळ होती, ती पूर्णपणे या कोरोना महामारीमुळे थांबली आहे.

किसन भोसले

साखरवाडी : कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण राज्यातल्या शाळांना सुट्या आहेत. सध्या विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातल्या शाळा ओस पडल्या असून, येथे कोणीही फिरकत नसल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सध्या शांततेचे वातावरण तयार झाले आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची नेहमीच शाळेमध्ये वर्दळ होती, ती पूर्णपणे या कोरोना महामारीमुळे थांबली आहे.

फलटण तालुक्यातील साखरवाडी विद्यालय ही कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले असून, या विद्यालयाचे क्रीडांगण ओस पडले असून, पावसामुळे या माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर गवताचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. एरवी हे मैदान स्वच्छ व निर्मळ असणारे केवळ विद्यार्थी वर्ग घरीच बसून असल्यामुळे या मैदानावर हिरव्या गवताने आपली हजेरी दर्शवली आहे.

साखरवाडी विद्यालयाचे हे मैदान विद्यार्थ्यांनी नियमित फुलून जाते. शाळेमध्ये नेहमीच गोंगाट, विद्यार्थ्यांचा किलबील आवाज, प्रार्थना, मैदानावरील शाळेचे उपक्रम, विविध खेळांना कोरोना महामार्गामुळे चांगलाच आळा बसला असून, लवकरात लवकर हा कोरोना महामारीचा विळखा सुटावा आणि शाळा पूर्वपदावर याव्यात. तसेच शैक्षणिक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शाळेमध्ये शैक्षणिक धडे मिळावेत, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना येथील शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे.