बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोक धास्तावले
गजबजणार्या बाजारपेठा झाल्या नि:शब्द : छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.
रणजित लेंभे
पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहेत. तरीही जिल्ह्यात कोरोनाचे अक्षरशः थैमान सुरू आहे. सोमवार, दि. 12 पासून जिल्ह्यात दररोज एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसात 8762 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दोनच दिवसात 2977 रुग्ण आढळून आल्याने व 71 बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासियांची झोप उडाली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वीच गर्दी टाळण्यासाठी गावागावांतील आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. असे असतानाही ग्रामीण भागात नागरिकांचा, वाहनधारकांचा मुक्त संचार सुरू होता. मात्र, गेल्या आठवड्यातील बाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्यामुळे ग्रामीण नागरिकांनी भलतीच धास्ती घेतली असून, काही लोकांनी शेतातील कामांवर भर दिला आहे तर काहींनी घरी सुरक्षित राहण्यास पसंती दिली आहे.
बेडसाठी धावाधाव आणि भीतीचे माहोल; कृतिशील दिलासा हवाय
जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा चिंताजनक स्थिती एप्रिल महिन्यात उद्भभवलेल्या दुसर्या लाटेत निर्माण झालीय. बाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या, ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचे काम आरोग्य विभागाचेच आहे. तपासण्या केल्या की जबाबदारी संपत नाही. जे बाधित आलेत त्यांच्यावर उपचार झालेच पाहिजेत. होम आयसोलेशनमुळे आरोग्य विभागाचा ताण हलका झालेला आहे. मात्र, दुसरीकडे प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार, सुविधा मिळायलाच हव्यात. उगाच तपासण्या वाढवल्यात अन् उपचार मिळत नसतील तर सर्वच धावाधाव व्यर्थ ठरेल. दिलासा कृतिशील असायला हवा, हे निश्चित.
बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. विनाकारण बाहेर पडणे चुकीचं आहे. आरोग्य प्रशासनाच्या सूचनेचे पालन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता स्थानिक आरोग्य प्रशासनला लसीकरणापासून ते कोविड सेंटरच्या विलगीकरण व सेवा उपलब्ध या संदर्भात लागणार्या सुविधा याविषयी सातत्याने पाठपुरावा करण्याविषयी सूचना व प्रयत्न करत असल्याचे सातारा जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी सांगितले.