रुग्णसेवेसाठी पुष्कर कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज
80 बेडच्या सेंटरमध्ये 32 बेड ऑक्सिजन युक्त; रुग्णांना मिळणार योग्य उपचार
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंग
सातारा : कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, 32 ऑक्सिजनयुक्त बेडसह 80 बेडचे पुष्कर कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा रुग्ण सेवेसाठी सज्ज होत असून, येत्या दोन दिवसांत हे सेंटर चालू होणार आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 80 बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारून विनामोबदला रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले होते. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि बेड मिळाला नाही म्हणून कोणाचा जीव जाऊ नये या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे सेंटर पुन्हा रुग्णसेवेसाठी स्वखर्चाने तयार करून श्वास हॉस्पिटलकडे चालवण्यासाठी दिले आहे.
स्व. भाऊसाहेब महाराजांना 1978 पासून सातार्यातील जनतेने भरभरून प्रेम आणि साथ दिली. त्यांच्या पश्चात सातारकर आणि सातारा-जावली तालुक्यातील जनतेने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वडीलकीचे छत्र धरून कायम पुत्रवत प्रेम आणि आपुलकीची साथ दिली आहे. ज्या छत्रपतींच्या घराण्यात आम्ही जन्माला आलो, ज्या घराण्याचे वंशज म्हणून आम्हाला ओळखले जाते, त्याच घराण्याचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो आहे. तसेच कोरोना महामारीच्या गंभीर आणि कठीण परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने, कोरोना रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी म्हणून हे सेंटर पुन्हा सुरू करत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
वास्तविक, या सेंटरमध्ये 80 बेड असून त्यापैकी 32 बेड हे ऑक्सिजनच्या सुविधेसह उपलब्ध होणार आहेत.