pushakarcovidcenternews

esahas.com

रुग्णसेवेसाठी पुष्कर कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंग