deshvidesh

सेम रोल्स रॉयस लूक... जबरदस्त परफॉर्मन्स; येतेय अद्ययावत फिचर्ससह टोयोटाची आलिशान SUV


Same Rolls Royce look... great performance; Here comes Toyota's luxury SUV with updated features
Toyota Century SUV: टोयोटा सेंच्युरी कंपनीने 1967 मध्ये पहिल्यांदा सेडान कार म्हणून सादर केली होती. त्यानंतर यामध्ये अनेकदा अपडेट करण्यात आले. 1967 पासून आतापर्यंत जपानच्या बाजारपेठेत या गाडीती विक्री सुरू आहे.

Toyota Century SUV: जपानी कार उत्पादक कंपनी टोयोटानं (Toyota) अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध MPV टोयोटा वेलफायरचं (Toyota Vellfire) नेक्स्ट जनरेशन मॉडेल जागतिक बाजारपेठेत सादर केलं. यासोबतच कंपनीनं नवीन ऑफर म्हणून Century लाईन-अप परत करण्याचेही संकेत दिले आहेत. साठच्या दशकात कंपनीनं Toyota Century सेडान पहिल्यांदाच सादर केली होती. त्यावेळी हे सेडान मॉडेल ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय झालं होतं. आजपर्यंत या मॉडेलला मागणी असून मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. आता कंपनी याला SUV म्हणून सादर करणार आहे. सेंचुरी एसयूव्ही या वर्षाच्या अखेरीस बाजारात लॉन्च केली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे. 

नवीन SUV ही लोकप्रिय सेंच्युरी सेडान नंतरची दुसरी 'सेंचुरी-बेज'वर बेस्ड असलेलं दुसरं प्रोडक्ट असेल. ही सेडान प्रामुख्यानं जपानमध्ये विकली जाते. पण आता ही SUV कंपनी जपाननंतर इतरही बाजारात सादर करणार आहे. ही एक प्रीमियम SUV असेल जी ब्रँडच्या नेटवर्क विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावेल. सेंच्युरी ब्रँड अनेक जपानी बाजारपेठांमध्ये आधीपासूनच खूप लोकप्रिय आहे आणि आता इतर बाजारपेठांमध्येही लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एक मोनोकॉक एसयूव्ही असेल, जी लग्झरी वैशिष्ट्य आणि तंत्रज्ञानानं सुसज्ज असेल. त्यामुळे, ऑफ-रोडिंग व्हेईकलऐवजी सिटी राईडसाठी अधिक योग्य ठरेल. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये या SUV ची फ्रंट ग्रिल पाहून तुम्हाला रोल्स रॉयसची आठवण येईल. याशिवाय या SUV चे मोठे व्हिल्स कम्फर्ट ड्राईव्हसाठी उत्तम ठरतील. 

टोयोटा ग्रँड हाईलँडर एसयूव्हीमध्ये असलेल्या मोनोकॉक आर्किटेक्चरचा वापर टोयोटा नव्या एसयूव्हीमध्ये करण्याची शक्यता आहे. टोयोटा सेंच्युरी एसयूव्हीमध्ये देण्यात येणारा व्हीलबेस केबिन स्पेसचा विचार करुन देण्यात आलेला आहे. दरम्यान, कंपनीनं अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, सोशल मीडियावर टोयोटाच्या नव्याकोऱ्या एसयूव्हीच्याच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, या SUV ची लांबी 5.2 मीटर आणि रुंदी सुमारे 2 मीटर असू शकते. 

 
 

काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, नवी सेंच्युरी एसयूव्ही लँड क्रूजरच्या तुलनेत महाग असणार आहे. ज्याचा अर्थ आहे की, ही टोयोटाची रेंज टॉपिंग एसयूव्ही असू शकते. Toyota Century मध्ये कंपनी V12 पेट्रोल इंजिनचा वापर केला जाऊ शकतो. परंतु, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या, ही SUV सुरुवातीच्या टप्प्यात आहे, त्यामुळे याला वेळोवेळी अनेक अपडेट्स मिळतील. ग्राहकांना या SUV मध्ये दमदार इंजिनसह अनेक क्लासी फिचर्स मिळू शकतात.