deshvidesh

सातारा जिल्ह्याच्या आरक्षण सोडतीत खुल्या गटाची चांदी

सातारा पालिकेत सात प्रभाग अनुसुचित जाती व एक प्रभाग अनुसुचित प्रवर्गासाठी आरक्षित

Open group get silver in Satara district reservation draw
सातारा पालिकेच्या पंचवीस प्रभागांची आरक्षणं सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे पन्नास जागांसाठी पंचवीस महिला व पंचवीस पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.

सातारा : सातारा पालिकेच्या पंचवीस प्रभागांची आरक्षणं सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे पन्नास जागांसाठी पंचवीस महिला व पंचवीस पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे. महिला प्रवर्गात 21 जागा खुल्या, तर 4 जागा अनुसुचित जाती व जमातीसाठी, पुरुष वर्गात 22 जागा खुल्या गटाच्या, तर तीन जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव झाल्या आहेत.
प्रभाग क्रं १ मध्ये यंदा प्रथमच लोकसंख्या वाढीमुळे अनुसुचित जमातीचे महिला प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने भटक्या जमातीचे नेतृत्व पहिल्यांदाच पालिकेत पोहचणार आहे. पालिकेच्या आरक्षित अकरा ओबीसी जागांचा निर्णय कायद्याच्या कचाटयात अडकल्याने खुल्या गटांच्या जागांसाठी राजकीय चुरस वाढली आहे.
नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथील शाहू कला मंदिरात सोमवारी (दि. १३) सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे यावेळी निश्चित करण्यात आली. हद्दवाढ झाल्याने यंदा ५० पैकी २५ महिला व २५ पुरुष पालिकेत निवडून जाणार आहेत. प्रांत मिनाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरवात झाली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आरक्षण सोडतीची माहिती दिली. तर निवडणूक निरीक्षक मोहन प्रभुणे यांनी या सोडतीची प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडली. यानंतर सकाळी साडेअकरा वाजता ऐश्वर्या जाधव या शाळकरी मुलीच्या हस्ते आरक्षणाची पहिली चिठ्ठी काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 1, 2, 4, 8, 13 व 15 या सात प्रभागांमध्ये अनुसुचित जमातीचे आरक्षण पडले. प्रभाग 1 अ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे. हद्दवाढीमुळे भटक्या जमातीचे आरक्षण निर्माण होऊन या प्रवर्गातील नेतृत्व पहिल्यांदाच पालिकेत पोहचणार आहे. खुल्या गटांसाठी मागास प्रवर्ग वगळता 21 महिला व 22 पुरुष अशा 43 खुल्या जागांमुळे इच्छुकांच्या राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत.
आरक्षण सोडतीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने अर्धा तासात पार पाडली. यामध्ये प्रभाग एक अनुसुचित जमाती व प्रभाग 2, 3, 4, 8, 13, 15 अनुसुचित जातीसाठी आरक्षित होऊन, तर प्रभाग 16 ते 25 खुल्या जागांसाठी राजकीय लढती पहायला मिळणार आहेत. प्रभाग 2, 3, 8, या प्रभागात ब गटासाठी महिला सर्वसाधारण उमेदवारांना संधी मिळणार आहे.
ऐश्वर्या कोटगी, वैष्णवी जाधव, दिव्या मोरे व प्रणव जाधव यां विधार्थ्यांना आरक्षणाच्या चिठ्ठया उघडण्याची संधी देण्यात आली. या आरक्षण सोडतीची पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरक्षण निहाय मांडणी केली. यावेळी नगर विकास आघाडीचे पक्ष प्रतोद अमोल मोहिते, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, शेखर मोरे पाटील, भालचंद्र निकम, सजग नागरिक मंचचे संतोष शेंडे, अमित शिंदे, माजी नगरसेवक विजय काटवटे यावेळी उपस्थित होते. सातारा विकास आघाडीचा एकही नगरसेवक आरक्षण सोडत प्रक्रियेला उपस्थित नव्हता.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे -
प्रभाग क1 अ- अनुसुचित जमाती ( महिला )
1 ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रं 2 अ - अनुसुचित जाती
क्रं2 ब -सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रं 3 अ- अनुसुचित जाती
3 ब- सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रं 4 अ- अनुसुचित जाती महिला  
प्रभाग क्रं4 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 5 अ- सर्वसाधारण महिला 5 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 6 अ= सर्वसाधारण महिला 6 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 7 अ- सर्वसाधारण महिला क्रं 7 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 8 अ- अनुसुचित जाती
8 ब- सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रं 9अ- सर्वसाधारण महिला    9 ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रं 10 अ- सर्वसाधारण महिला     10 ब सर्वसाधारण

प्रभाग कं 11 अ- सर्वसाधारण महिला     11 ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रं 12 अ - सर्वसाधारण महिला     12 ब -सर्वसाधारण

प्रभाग क्र 13 अ- अनुसुचित जाती महिला 13 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 14 अ- सर्वसाधारण महिला  14 ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रं 15 अ- अनुसुचित जाती महिला 15 ब - सर्वसाधारण

प्रभाग क्रं 16 ते 25
अ- सर्वसाधारण महिला
ब-  सर्वसाधारण

म्हसवडला सात प्रभाग झाले खुले
म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत म्हसवड पालिकेच्या सभागृहात झाली. माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षेखाली व मुख्याधिकारी सचिन माने यांच्या उपस्थित काढण्यात आली. या आरक्षण सोडतीत एकूण 10 प्रभातील प्रभाग क्रमांक 1, 3 व 4 हे तीन प्रभाग अनुसूचीत जातीसाठी आरक्षित झाले असून उर्वरीत प्रभाग हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे.
म्हसवड पालिकेच्या आगामी होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभागातील आरक्षण सोडत मंगळवारी पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी या सोडतीच्या चिठ्ठ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आल्या.
आरक्षण सोडत झालेल्या एकूण 10 प्रभागात प्रभाग क्रमांक 1 मध्ये शेटे वस्ती, कोडलकर वस्ती, पोलीस स्टेशन परिसर, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उद्यमनगर - 1, पिसे, झपाटे वस्ती, लांब वस्ती, कारंडे वस्ती. प्रभाग क्रमांक 2 मध्ये मासाळवाडी तलाव परिसर, मासाळवाडी, लोखंडे वस्ती, ढोकमोडा, बोंबाळे वस्ती, मानेवाडी, राऊतवाडी. प्रभाग क्रमांक 3 मध्ये भांदुर्गे, कलढोणे वस्ती, सरतापे वस्ती, कोले वस्ती, शेरी, बेघर वस्ती, हिंगणी रस्ता, माळावरील मातंग वसाहत, वाकवस्ती, खरामळा.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये मणेर बोळ, नेहरू पथ, भंडारे बोळ, मोमीन गल्ली, चांभार गल्ली, लोटके वस्ती, यात्रा पटांगण रोड, काझी मळा, गावातील हरीजन वस्ती, उद्यमनगर - 2. प्रभाग क्रमांक 5 मध्ये रामोशी गल्ली, जनावरांचा दवाखाना, माळी, खटीक, कथले बोळ, तिवाटणे, जैन मंदिर, गोपी कॉर्नर, सिध्दनाथ पथ, चौडेश्वरी मंदिर, कोष्टी गल्ली, खंडोबा मंदिर परिसर, म्हेत्रे वाडा, माळी गल्ली, केवटे पिंजारी परिसर.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये सिध्दनाथ हायस्कुल परिसर, मासाळ टेक, त्रिगुणे बोळ, महात्मा गांधी पथ, मोडासे हॉस्पिटल ते कासारबोळ, राजवाडा, नाभिक गल्ली, सुतार गल्ली, सिध्दनाथ मंदिर परिसर, गुरव गल्ली कोळी गल्ली, प्रभाग क्रमांक 7 मध्ये हाउसिंग सोसायटी, सूर्यवंशी वस्ती, चोपडे वस्ती, एस टी स्टैंड, कैकाडी गल्ली, सणगर गल्ली, जुनी नगरपरिषद श्र्ीराम मंदिर परिसर, बाजार पटांगण, विठ्ठल मंदिर, जुने पोस्ट, कासार बोळ. प्रभाग क्रमांक 8 मध्ये शेंबडे वस्ती, खांडेकर वस्ती, काळापट्टा, तावसे वस्ती, डोबे मळा, महादेव मळा, शिंदे, पवार, पंत वस्ती, विरकर मळवी, रेस्ट हाऊस, पोस्ट ऑफिस परिसर. प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोनेवाडी, मसाईवाडी, नागोबा मंदिर, कबीर, भोरे, गुरव वस्ती, दहिवडे मळा बिरोबा मंदिर, झगडे वस्ती, केवटे वस्ती, मेगासिटी, बनगरवाडी.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये खासबाग वस्ती, राखुंडे वस्ती, जठरे वस्ती, शिंदे वस्ती, बेघर वसाहत, खोत गल्ली, ढम गल्ली, विरकरवाडी, सोकासणे वस्ती हा भाग येतो एकूण 10 प्रभागातील प्रत्येक प्रभागात 2 असे एकुण 20 सदस्यासाठीची हि निवडणूक होत असून जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांना अडचणी निर्माण झाल्या असून अनेकांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत.

म्हसवड आरक्षण
म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत म्हसवड पालिकेच्या सभागृहात पार पडले. यामध्ये प्रभाग रचेनुसार आरक्षण पुढील प्रमाणे : प्रभाग क्र. 1 अ-अनुसुचित जाती  सर्वसाधारण, ब- सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत तर राहिलेले प्रभाग क्र. 2 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरूष, प्रभाग क्र 3 अ- अनुसुचीत जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. 4 अ- अनुसुचित जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र. 5 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरूष, प्रभाग क्र. 6 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरूष, प्रभाग क्र. 7 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र. 8 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्र. 9 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरूष, प्रभाग क्र. 10 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण पुरूष, असे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून या सोडतीमुळे अनेकांच्या नगरसेवक होण्याचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे दिसून आले.

कराड आरक्षण
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज सातार्‍यासह जिल्ह्यातील नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडती काढण्यात आल्या. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात प्रांत उत्तम दिघे व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रभागनिहाय सोडत काढताना ओबीसी आरक्षण वगळून अनुसूचित जातीच्या २, सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १४ जागा आरक्षित असणार आहेत. नगरपालिकेच्या एवूâण ३१ जागा असून प्रभाग क्रमांक १५ मध्ये तीन जागा असणार आहेत.
कराड नगरपालिका प्रभाग निहाय आरक्षण सोडत-
प्रभाग क्रमांक 1
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 2
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 3
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 4
अ- अनुसूचित जाती महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 5
अ- सर्वसाधारण महिला
ब- अनुसूचित जाती

प्रभाग क्रमांक 6
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 7
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 8
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण


प्रभाग क्रमांक 9
अ -सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 10
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 11
अ- अनुसूचित जाती महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 12
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 13
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 14
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक 15
अ- अनुसूचित जाती
ब-सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला

फलटण आरक्षण
फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत दि १३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आली.  उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोडत कार्यक्रम नगर परिषदेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागे नव्याने झालेल्या हॉलमध्ये सभागृहात पार पडला. यावेळी फलटण शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने फलटण शहर हे १३ प्रभागात विभागले असून फलटण नगरपरिषदेमध्ये २७ नगरसेवक असणार आहेत . त्यामध्ये ५ नगरसेवक हे अनुसूचित जातीसाठी राखीव असणार  आहेत . तर एकूण १४ जागा ह्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत.  
आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक, शहरातील स्थळ दर्शक खुणांसह जाहीर प्रभाग रचना व जाहीर करण्यात आलेले आरक्षण खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 (जागा  अ , जागा ब ) श्रीराम सहकारी साखर कारखाना , कृषी उत्पन्न बाजार समिती , पुजारी कॉलनी , नगर परिषद वॉटर वर्क्स , श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय , फिरंगाई मंदिर .

आरक्षण सोडत -
जागा अ -अनुसूचित जाती - महिला
जागा ब - सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 2 (जागा अ , जागा ब ) – बुद्धविहार , रानडे पेट्रोल पंप , बँक ऑफ बडोदा , मटण मार्केट , पेठ मंगळवार , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक  सभागृह .

आरक्षण सोडत -
( जागा अ ) - अनुसूचित जाती - महिला
( जागा ब ) - सर्वसाधारण खुला


 प्रभाग क्रमांक 3 ( जागा अ , जागा ब ) - कुरेशी मस्जिद , जैनमंदिर , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिर , लक्ष्मीमाता मंदिर , स्मशान भूमी .

आरक्षण सोडत -
 ( जागा अ ) - अनुसूचित जाती
 ( जागा ब ) - सर्वसाधारण खुला - महिला


 प्रभाग क्रमांक 4 ( जागा अ ,जागा ब ) महादेव मंदिर , गणेश नगर , फलटण इंडस्ट्रीज हरिबुवा मंदिर , जुनी इमारत , निमकर सिड्स , बॅरीस्टर राजाभाऊ भोसले बंगला , महाराजा हॉटेल , बोरावके शोरुम .

 आरक्षण सोडत -
( जागा अ ) - अनुसूचित जाती - महिला
( जागा ब ) - सर्वसाधारण खुला


 प्रभाग क्रमांक 5 ( जागा अ , जागा ब ) - श्रीकृष्ण बेकरी , संतोषी माता मंदिर , काळुबाई मंदिर , गणपती मंदिर .

आरक्षण सोडत -
 ( जागा अ ) – सर्वसाधारण खुला - महिला
  ( जागा ब ) - सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 6 ( जागा अ , जागा ब ) बुधवार पेठ , लाटकर तट्टी , ईदगाह तळे , दफन भुमी , खंडोबा मंदिर .


आरक्षण सोडत -
( जागा अ ) – सर्वसाधारण खुला - महिला
( जागा ब ) – सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 7 (जागा  अ ,जागा ब ) पाचबत्ती चौक , - बादशाही मस्जिद , फलटण गेस्ट हाऊस , हत्तीखाना , टाळकुटे मंदिर , श्रीराम पोलीस चौकी , कुंभार टेक .

आरक्षण सोडत-
 ( जागा अ ) - सर्वसाधारण खुला - महिला
( जागा ब ) - सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 8 ( जागा अ , जागा ब ) - फलटण नगरपरिषद इमारत , भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा , एस.टी. स्टँड , श्रीराम हायस्कूल , व्होरा बेबी केअर सेंटर , स्पंदन हॉस्पिटल .

आरक्षण सोडत-
( जागा अ ) – सर्वसाधारण खुला - महिला
( जागा ब ) - सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 9 ( जागा अ , जागा ब ) - फलटण लाईफ लाईन हॉस्पिटल , कॅनरा बँक , नारळी बाग , संत ज्ञानेश्वर मंदिर , विश्राम गृह , माळजाई मंदिर , मुधोजी हायस्कूल .

आरक्षण सोडत -
( जागा अ ) - सर्वसाधारण खुला - महिला
( जागा ब ) – सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 10 ( जागा अ , जागा ब ) - दगडी पूल , हनुमान मंदिर , श्रक्षराम मंदिर , जैन मंदिर , नवलबाई कार्यालय , महादेव मंदिर , स्वामी समर्थ मंदिर .

आरक्षण सोडत -  
( जागा अ ) - सर्वसाधारण खुला - महिला
( जागा ब ) - सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 11 (जागा अ, जागा ब ) – रंगशिळा मंदिर, आबासहेब मंदिर, ग्रामीण पोलीस स्टेशन, मुधोजी कॉलेज, हरीनारायण टेकडी मंदिर, बाहुबली जिनींग फॅक्टरी

आरक्षण सोडत -
(जागा अ) – सर्वसाधारण खुला - महिला
(जागा ब) - सर्वसाधारण खुला


प्रभाग क्रमांक 12 ( जागा अ , जागा ब ) - तहसिल व प्रांत कार्यालय, सत्र न्यायालय, पद्मावती नगर, श्रीखंडे मळा, भडकमकर नगर, पोलीस स्टेशन, मध्यवर्ती इमारत.

आरक्षण सोडत -
(जागा अ) - अनुसूचित जाती
(जागा ब ) - सर्वसाधारण खुला - महिला

प्रभाग क्रमांक 13 (जागा अ, जागा ब, जागा क) गोळीबार मैदान, विद्यानगर, संजीवराजे नगर, हाडको कॉलनी, लक्ष्मी विलास व्हिला.

आरक्षण सोडत-
(जागा अ) सर्वसाधारण खुला - महिला
(जागा ब) सर्वसाधारण खुला - महिला
(जागा क)  सर्वसाधारण खुला

पाचगणी आरक्षण
आज नगरपालिकेच्या छ्त्रपती शिवाजी सभागृहात या सोडतीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधारण पुरुष ८, अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण २ , अनुसूचित जाती जमाती महिला २ , सर्वसाधारण महिला ८ असे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्यांदाच इतर मागास प्रवर्ग सोडून निवडणूक होणार आहे.
ही सोडत आरक्षण सोडत नियंत्रक अधिकारी अर्चना नाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
सुरुवातीला ज्या प्रभागात अनुसूचित जाती जमाती लोकसंख्या अधिक आहे ते प्रभाग अनुसूचित जाती जमातींच्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. या नियमानुसार प्रभाग ९, ३ ,२ व ८ हे प्रभाग अनुसूचित जाती साठी राखीव ठेवण्यात आले. अनुसूचित जातीच्या महिला व पुरुष यांचे आरक्षण चिठ्ठीद्वरे शालेय चिमुकल्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर नियमानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रभाग १ (अ.. सर्वसाधारण महिला राखीव
ब…. सर्वसाधारण ),
(प्रभाग २ अ…अनुसूचित जाती महिला राखीव, ब….सर्वसाधारण ),
प्रभाग ३ (अ.. अनुसूचित जाती सर्वसाधारण ब…. सर्वसाधारण महिला ) ,
प्रभाग ४ (अ…सर्वसाधारण महिला ,ब….सर्वसाधारण ),
प्रभाग ५ ( अ.. सर्वसाधारण महिला ,ब… सर्वसाधारण ),
प्रभाग ६ (अ.. सर्वसाधारण महिला ,ब…. सर्वसाधारण ),
प्रभाग ७ (अ.. सर्वसाधारण महिला ,ब…. सर्वसाधारण ),
प्रभाग ८ (अ.. अनुसूचित जाती महिला राखीव, ब…. सर्वसाधारण ),
प्रभाग ९ (अ.. अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब…. सर्वसाधारण महिला ),
प्रभाग १0(अ.. सर्वसाधारण महिला ,ब…. सर्वसाधारण )
या आरक्षणामुळे काहीना आपला पूर्वीचा प्रभाग व हक्काचा विभाग आरक्षणामुळे गमवावा लागणार असल्याने त्यांना इतर प्रभागात स्थलांतरित होवून आपले नशीब आजमवावे लागणार आहे.

रहिमतपुर आरक्षण
प्रभागरचनेनुसार आरक्षण उत्सुकता  असताना रहिमतपुर नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहिर झाली. सोमवार१३ रोजी रहिमतपुर येथील जंगम मठात  प्रांतधिकारी ज्योति पाटील, मुख्याधिकारी संजिवनी दळवी यांनी आरक्षण सोडत जाहिर केली. रहिमतपुर शहरातील माजी सत्ताधारी, विरोधक आणि नागरिक यावेळी उपस्थीत होते.
दहा प्रभागातुन वीस नगरसेवक प्रतिनिधीत्व करणार असल्याने यावेळी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. सोयीचा प्रभाग आरक्षीत झाल्याने काहींच्या अपेक्षा वाढल्या, तर काहिंचा अपेक्षाभंग झाल्याचे सांगितले जाते. प्रभाग क्र. १ व ४ मध्ये प्रत्येकी एक जागा सर्वसाधारणसाठी राहिली आहे. उर्वरित सर्वच प्रभागांमध्ये एक जागा सर्वसाधारणसाठी खुली तर एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे.  माजी नगरसेवक बेदिल माने, शशिकांत भोसले, शेखर माने, राजेंद्र नलवडे, एस. के. माने, शंकर कदम, राजेश पाटील, जीवन कदम, राजेंद्र कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आरक्षण सोडतकामी नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसह मंडळ अधिकारी विनोद सावंत व तलाठी यांनी परिश्रम घेतले.

मेढा आरक्षण
जावळी तालुक्याची राजधानी मेढा च्या नगर पंचायतीचे १७ जागेसाठी सोमवारी आरक्षण जाहीर झाले. मेढा नगर पंचायतीत प्रभागवार पुढील प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. प्रभाग १ सर्वसाधारण महीला ,प्रभाग २  सर्वसाधारण , प्रभाग ३ सर्वसाधारण महीला ,प्रभाग ४ सर्वसाधारण , प्रभाग ५ सर्वसाधारण महीला, प्रभाग ६ अनुसुचित जमाती महीला ,प्रभाग ७ सर्वसाधारण महीला ,प्रभाग ८ सर्वसाधारण ,प्रभाग ९ सर्वसाधारण , प्रभाग १० सर्वसाधारण महीला , प्रभाग ११ अनुसुचित जाती महीला , प्रभाग १२ सर्वसाधारण प्रभाग १३ सर्वसाधारण , प्रभाग १४ सर्वसाधारण , प्रभाग  १५ सर्वसाधारण महीला , प्रभाग १६ अनुसचित जाती प्रभाग १७ सर्वसाधारण महीला या प्रमाणे मेढा नगरपंचायत मध्ये आरक्षण जाहीर झाले आहे.

महाबळेश्वर आरक्षण
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता आरक्षण सोडत कार्यक्रम पालिकेच्या नगराध्यक्ष दालनामध्ये निवडणूक निरिक्षण अधिकारी राम हरी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व पालिकेच्या प्रशासक पल्ल्वी पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
आरक्षण सोडतीमध्ये मा.राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी परिशिष्ट ५ अन्वये प्रभागांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार प्रभाग क्र.८ व ६ आरक्षित होत आहे. सर्व प्रथम अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढणेत आली .प्रभाग क्र.८ व ६ प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून विद्यार्थ्याद्वारे काढणेत आलेला प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला.सदर सोडतीनुसार उर्वरित प्रभाग अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर अनुसूचित जमाती करीता परिशिष्ट ६ अन्वये प्रभागाच्या एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार प्रभाग क्र.5 आरक्षित होत आहे. प्रभाग क्र.५ मध्ये अनुसूचित जाती महिला अथवा अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.सोडतीनुसार अनुसूचित जमाती महिला अथवा अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग ५ आरक्षित करण्यात येईल. उर्वरित सर्व प्रभागामधील 1 जागा सर्वसाधारण महिला करीता आरक्षित ठेवण्यात आली आहे.