गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती पुढे आली आहे.
नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती पुढे आली आहे.
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना आज गुरुवारी सुरत येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करत शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली. दोन वर्षापूर्वी राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावर ही शिक्षा झाली. जाणून घेऊयात हे प्रकरण नेमके आहे तरी काय?
राहुल गांधी यांना ज्यासाठी दोन वर्षांची शिक्षा झाली ते जाणून घेण्यासाठी ४ वर्ष मागे जावे लागले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. कोलार येथील प्रचार सभेत बोलताना ते म्हमाले की, सर्व चोरांची आडनावे मोदी कशी काय असतात? राहुल गांधींच्या या वक्तव्यावर सुरत वेस्ट येथील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान केल्याचे पूर्णेश यांनी म्हटले होते.
या खटल्याच्या सुनावणीसाठी ९ जुलै २०२० रोजी राहुल गांधींना कोर्टात हजर व्हावे लागले होते. या खटल्याची सुनावणी लवकर व्हावी यासाठी गेल्याच महिन्यात पूर्णेश मोदी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने सुरत सत्र न्यायालयाला या प्रकरणाची जलद सुनावणी करण्याचे आदेश देत याची सुनावमी उच्च न्यायालयात करण्याची याचिका रद्द केली होती.
गेल्या एका महिन्यापासून सुरत कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान राहुल गांधींच्या वकिलांनी म्हटले होते की, मोदी कोणता समुदाय नाही. राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होते. त्यामुळे मानहानीचा खटला त्यांनी दाखल केला पाहिजे. त्यानंतर सुरत कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एच एच वर्मा यांनी या खटल्याची अंतिम सुनावणी आज २३ मार्च रोजी निश्चित केली होती.
काय म्हणाले होते २०१९च्या भाषणात?
सर्व चोरांची आडनावे मोदी का असतात? मग ते ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी. इतक नाही तर पुढे ते असे ही म्हणाले की, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी आणि शोध घेतला तर अजून नावे समोर येतील. या भाषणाच्या आधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता. चौकीदारच चोर आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्या, ललित मोदी, अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी ही चोरांची टोळी आहे. राहुल गांधी यांनी असे देखील म्हटले होते की जनतेचा पैसा या लोकांच्यात फिरत असतो.