deshvidesh

अखेर अमृतपाल सिंहला 36 दिवसानंतर बेड्या


Finally after 36 days, Amritpal Singh was shackled
अखेर अमृतपाल सिंहला 36 दिवसानंतर बेड्या मोगा इथल्या गुरुद्वारातून अटक

साहस वार्ता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंहला अखेर 36 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अमृतपालला तब्बल 36  दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. तर त्याची पत्नी किरणदीप कौर हिला तीन दिवसांपूर्वी अमृतसर विमानतळावर गुरुवारी (21 एप्रिल) थांबवण्यात आले होते. त्यानंतर सोडून देण्यात आले होते. विशेष म्हणजे अमृतपाल सिंहच्या इतर साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते.
खलिस्तानवादी अमृतपाल सिंगचा गेल्या 36  दिवसांपासून पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांकडून शोध सुरु  होता. विशेष म्हणजे देशातील महत्वाच्या सुरक्षा यंत्रणांकडून देखील त्याचा शोध सुरु होता, पण त्यांना यश मिळत नव्हते.  तर आधी पटियाला, नंतर हरियाणातील शाहबाद आणि नंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी अशाप्रकारे अमृतपाल सतत आपली ठिकाणं बदलत होता. तसेच यूपी सीमेवरून ते नेपाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र एवढ करूनही अमृतपाल सिंहचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र आज अमृतपाल सिंहने स्वतःच आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे.
अमृतपालच्या पत्नीला विमानतळावर अडवले...
अमृतपाल सिंह याच्या पत्नीला अमृतसर विमानतळावर अडवत पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर ही लंडनला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती, मात्र विमानात बसण्यापूर्वीच पोलिसांना माहिती मिळाल्याने तिला ताब्यात घेण्यात आले होते. किरणदीप कौर सकाळी 11.40 वाजता विमानतळावर पोहोचली, दुपारी 2.30 च्या फ्लाईटने ती ब्रिटनला जात होती. पण लूक आऊट नोटीस जारी असल्यामुळे इमिग्रेशनने किरणदीप कौरला प्रवास करु दिला नाही आणि तिला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले होते.