sports

कोरोनाचे नियम मोडून विवाह केल्याप्रकरणी दहा हजाराचा दंड

पाटण तालुका प्रशासन अलर्ट; व्हिडिओच्या आधारे केली कारवाई

कोयना भागातील रासाठी याठिकाणी काल एक लग्न पार पडले. त्या लग्नाचे काही फोटो व व्हिडिओ प्रशासनाच्या हाती लागल्याने पाटणचे अधिकारी थेट रासाठी या ठिकाणी पोहचले आणि लग्न मालकावरती दहा हजार रुपयांचा दंड केला. ही कारवाई तहसिलदार टोंपे, गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे यांनी केली. कोरोना काळामध्ये प्रशासन जीव ओतून काम करत आहे. लोकांना अनेक सोईसुविधा मिळत नाही. बेडवाचून अनेकांचे प्राण जात आहेत. तरी देखील लोकांमध्ये सुधारणा होत नाही. लोकांच्या हितासाठी प्रशासन रस्त्यावरती उतरुन लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे लोकांना कोरोना बाबत गांभिर्यचं राहिलेलं नाही. लग्न कार्य होत राहतं मात्र पुढे जाऊन एखादा बरावाईट प्रसंग घडू नये म्हणून प्रशासन अनेक नियम अटी घालून गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने काटेकोर अंमलबजावणी करत आहे. कोयना भागामध्ये गेली अनेक दिवस झाले कोरोना ने थैमान घातलेले आहे. रासाठी मद्ये खुद्द काल एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला होता. त्या बाधितास दहन करण्यास अनेक तास वेटिंग करावे लागले. याच रासाठी गावामध्ये जोमात लग्न आणि जोशात वरात साजरी झाली. याच गावमध्ये लग्न समारंभ झाला. या समारंभास लोकांची गर्दी व विनामास्क फिरणे या गोष्टी चीं खबर प्रशासनाला लागली. तात्काळ आज पाटणचे तहसिलदार व गटविकास अधिकारी रासाठी या ठिकाणी पोहचले. तद्नंतर कोयना पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत माळी व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य याठिकाणी आले. सदर लग्न समारंभाची चौकशी केल्यानंतर लग्न मालकावरती दंडात्मक कारवाई करुन दहा हजार रुपये दंड करण्यात आला.