सर्वांनी एकत्र येत कोरोनाशी दोन हात करूया
आ. महेश शिंदे : काटेवाडी येथे कोरोनाबाबत आढावा बैठक संपन्न
‘गेल्यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं होत. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. आपल्यावर पुन्हा एकदा तीच वेळ आली असून स्थानिक प्रशासन, नागरिकांनी कोरोनाबद्दल संवेदनशील राहून कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
निढळ : ‘गेल्यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं होत. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. आपल्यावर पुन्हा एकदा तीच वेळ आली असून स्थानिक प्रशासन, नागरिकांनी कोरोनाबद्दल संवेदनशील राहून कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
काटेवाडी (ता. खटाव) येथील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पवार, विस्तार अधिकारी एल. जे. चव्हाण, तलाठी गणेश बोबडे, सरपंच बाळासाहेब जगदाळे, उपसरपंच विकास पांडेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते पृथ्वीराज पांडेकर, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, सुसेन जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
या आठवड्यात काटेवाडीत 29 कोरोनाबाधित पेशंट सापडले असून, दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी काटेवाडीत आढावा बैठक घेऊन ग्रामस्थांना धीर दिला.
दरम्यान, आमदारकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसांत कोरोनाचे संकट आले. मतदारसंघात पहिला रुग्ण आढळल्यापासून त्याच्या निवासस्थानी भेट देण्यापासून परिसर निर्जंतुक करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्राला भेट, टप्प्या-टप्प्याने यंत्रणा वाढविणे, कोविड सेंटरमध्ये स्वत: जाऊन बाधितांसाठी योगाचे धडे आदी कार्य जीव धोक्यात घालून आ. महेश शिंदे यांनी केले.
आरोग्य यंत्रणा व अन्य टीमचे अहोरात्र परिश्रम, जनतेच्या सहकार्याने अत्यंत बिकट स्थितीतही कोरोनाशी ‘दोन हात’ करू शकलो, असेही ते म्हणाले.