sports

खटाव तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार

प्रदीप विधाते यांची ग्वाही : खटाव-भराडे वस्ती, धकटवाडी, सिद्धेश्‍वर कुरोली रस्त्यांचे भूमिपूजन

‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्‍या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.

खटाव : ‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्‍या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.

खटाव येथे खटाव ते भराडे वस्ती, धकटवाडी, सिद्धेश्‍वर कुरोली या रस्त्याचे भूमिपूजन जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष जयदीप शिंदे, मनोज देशमुख, माजी सरपंच बबनराव घाडगे, माजी सरपंच सतीश शिंदे, मुगूटराव पवार, विजय बोर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदीप विधाते म्हणाले, ‘कोरोनामुळे विकासकामांवर परिणाम झाला. पण पाठपुरावा मात्र सुरू होता. या रस्त्याचा प्रश्‍न कायमचा मिटावा तसेच भरीव निधी मिळावा यासाठी पदाचा उपयोग केला. पहिल्या प्रयत्नात 22 लाखांचा निधी मिळाला. पण एवढ्या पैशात रस्ता झाला नसता. त्यामुळे जिल्हा परिषदेचा 2019/20 चा अखर्चित 70 लाख निधी असा 92 लाखांचा निधी या रस्त्यासाठी मिळाला आहे. हा रस्ता इतर जिल्हा मार्गात असल्याने दर्जेदार रस्ता होणार आहे. तसेच खटाव-कटगुण उर्वरित रस्ता पूर्ण करण्यात यश आले आहे. तर खटाव-लोणी या रस्त्यासाठी शासनाच्या योजनेतून 1 कोटी 50 लाख प्रस्तावित केले आहेत. यासाठी राज्य शासनाच्या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देतील. तसेच विधाते वस्तीला उर्वरित कामासाठी 15 लाख दिले आहेत. तसेच येरळा नदीवरचा बाराबिग्याला जोडणारा पूल नाबार्डमधून प्रस्तावित केला आहे. तसेच अंबाबाई मंदिर साकव पूल मार्गी लागत आहे.’

राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष जयदीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी रमेश शिंदे, दिलीप जाधव, किरण देशमुख, किरण राऊत, नंदकुमार पवार, दिलीप जोशी, रशिद शिकलगार, चंद्रकांत भराडे, गणेश शेडगे, पिंपळेश्‍वर संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

रसूलभाई मुल्ला यांनी आभार मानले.