‘गेल्या तीन वर्षांत बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोट्यवधीची विकासकामे केल्यामुळे बुध गाव रोलमॉडेलच्या दिशेने वाटचाल करीत असून, बुधचा लवकरच कायापालट होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
‘निमसोड गावचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्न अनेक अडथळ्यांवर मात करून सोडवला असून, इथून पुढच्या काळात आपण विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ अशी ग्वाही हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!