sports

बुध गावची ‘रोलमॉडेल’च्या दिशेने वाटचाल

आ. महेश शिंदे : बुध येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

‘गेल्या तीन वर्षांत बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोट्यवधीची विकासकामे केल्यामुळे बुध गाव रोलमॉडेलच्या दिशेने वाटचाल करीत असून, बुधचा लवकरच कायापालट होईल,’ असा विश्‍वास शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

निढळ : ‘गेल्या तीन वर्षांत बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोट्यवधीची विकासकामे केल्यामुळे बुध गाव रोलमॉडेलच्या दिशेने वाटचाल करीत असून, बुधचा लवकरच कायापालट होईल,’ असा विश्‍वास शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

बुध (ता. खटाव) येथे आ. महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून 25:15 निधीतून सहा सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यांचे उद्घाटन व महालक्ष्मी मंदिर येथील सभागृहाचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे, विसापूरचे हरिश्‍चंद्र सावंत, माजी सरपंच शिवाजी शेडगे, मोळचे सरपंच वैभव आवळे, सुसेन जाधव, सागर मदने, रोहन देशमुख, सुधाकर कुंभार, ग्रामपंचायत सदस्य गणेश सातपुते, शशिकांत घाटगे, महादेव सूर्यवंशी, राम घाटगे उपस्थित होते. 

अभयसिंह राजेघाटगे म्हणाले, ‘बोळ तिथे काँक्रिटीकरण, गावातील एकही बोळ वंचित ठेवणार नाही. प्रत्येक घरापर्यंतचा रस्ता सिमेंटचा करण्याचा प्रयन्न केला जाईल. आज 20 रस्ते काँक्रिटीकरण केले आहेत. तर आठ कामे मंजूर असून लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरित कामेही मंजूर करून घेतली जातील.’

यावेळी आ. महेश शिंदे यांनी झालेल्या कामांची पाहणी करून सर्व कामे दर्जेदार केल्याबद्दल सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांचे विशेष कौतुक करून येणार्‍या काळात बुधच्या विकासामध्ये भरीव निधी देणार असल्याचे सांगितले.

यावेळी अमोल इंगळे, वैभव वसव, शब्बीर मुलाणी, अनिल जगदाळे, सागर जाधव, गुलाब सय्यद, संदीप महामुनी, ताहीर सय्यद, पृथ्वीराज पांडेकर, सुनील कुंभार, सत्यवान जाधव, राजेंद्र देसाई, अजित पाटील, संजय जाधव, कांताभाऊ जाधव, विशाल घाटगे व ग्रामस्थ उपस्थित होते.