sports

निमसोड गावच्या विकासासाठी प्रयत्नशील

रणजितसिंह देशमुख यांची ग्वाही : मागासवर्गीय वस्ती ते घाडगे पूर्व मळा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

‘निमसोड गावचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्‍न अनेक अडथळ्यांवर मात करून सोडवला असून, इथून पुढच्या काळात आपण विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ अशी ग्वाही हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

निमसोड : ‘निमसोड गावचा अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणीप्रश्‍न अनेक अडथळ्यांवर मात करून सोडवला असून, इथून पुढच्या काळात आपण विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे,’ अशी ग्वाही हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निमसोड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरी सुविधा अंतर्गत मागासवर्गीय वस्ती ते घाडगे पूर्व मळा रस्त्याच्या 19 लाख रुपये खर्चाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी सरपंच महेंद्र देशमुख, उपसरपंच शीतल सांगवे, अभिजीत देशमुख, भीमराव घाडगे, शिवाजी घाडगे, अशोक घाडगे, संजय घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

देशमुख म्हणाले, ‘आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक लहान-मोठे विकासाचे प्रश्‍न मार्गी लावले असून, इथून पुढच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न तसेच विकासकामांसाठी प्रयत्नशील राहून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.’

कार्यक्रमानंतर शंकर सांगावे यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच महेंद्र देशमुख, उपसरपंच शीतल सांगवे व नूतन सदस्यांचा सत्कार रणजितसिंह देशमुख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, ‘निमसोडच्या जनतेने जो आपल्यावर विश्‍वास दाखवला, त्या विश्‍वासाला कुठेही  तडा न जाऊ देता सर्वांना विश्‍वासात घेऊन एकदिलाने काम करून विकास साधण्यासाठी प्रयत्न करावा.’

यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमास अभिजित देशमुख, विवेक देशमुख, पं. स. माजी सदस्य भरतशेठ जाधव, विलासराव पाटील, भीमराव घाडगे, संजयशेठ शितोळे, प्रा. डोईफोडे, अशोकराव घाडगे, शिवाजी घाडगे, शंकर सांगवे, दिगंबर देशमुख, संजय घार्गे, पांडुरंग घाडगे, मोहनराव देशमुख, उत्तमराव घाडगे, बाळासाहेब घाडगे, भिकू घाडगे, विलासराव घाडगे, शंकर घाडगे, नीलेश घार्गे-देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.