sports

कास ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित; खा. उदयनराजेंकडून बहुतांश मागण्या मान्य


कास ग्रामस्थांनी कास धरणाचे काम बंद पाडून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.आमच्या दहा विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा अखेर कास ग्रामस्थांनी घेऊन कास धरणाचे काम बंद पाडले होते. अखेर आज खा. उदयनराजे भोसले यांचे मध्यस्थी केल्याने कास ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. 

सोनवडी : कास ग्रामस्थांनी कास धरणाचे काम बंद पाडून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.आमच्या दहा विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा अखेर कास ग्रामस्थांनी घेऊन कास धरणाचे काम बंद पाडले होते. अखेर आज खा. उदयनराजे भोसले यांचे मध्यस्थी केल्याने कास ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. 

उदयनराजे यांनी कास ग्रामस्थांच्या प्रमुख दहा मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन देऊन मंदिराचे काम सुरू केल्याने कास ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

कास धरणाच्या कामाला पुनःश्‍च सुरुवात करण्यात आली असून, मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होईल, असे अधिकारी वर्गाने उदयनराजे यांना सांगितले.