धरणाच्या कामामुळे कास-बामणोली रस्ता वारंवार होतोय बंद
स्थानिकांतून संतापाची लाट; कास धरणाशेजारून पर्यायी रस्ता देण्याची मागणी
कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी कोरघळ एकीवमार्गे वळवण्याच्या हालचाली संबंधित विभागाच्या सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह 20 किमीचे अंतर वाढत असल्याने मोठा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने या निर्यणाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांतून जनक्षोभ उसळू लागला असून कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस
सोनवडी : कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी कोरघळ एकीवमार्गे वळवण्याच्या हालचाली संबंधित विभागाच्या सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह 20 किमीचे अंतर वाढत असल्याने मोठा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने या निर्यणाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांतून जनक्षोभ उसळू लागला असून कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस्ता काढून देण्याची मागणी होत आहे. अन्यथा स्थानिकांतून तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
सातारा शहरातील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी कास धरणाची उंची वाढवण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे धरणांच्या पाणी साठ्यात व भिंतीच्या कामात कास बामणोलीकडे जाणारा प्रमुख महामार्गाचे काही अंतर बाधीत होत असल्याने धरणाशेजारी पर्यायी रस्ता काढून स्थानिकांचे दळणवळण सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे असताना धरणाच्या कामासाठी परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता वारंवार रस्ता बंद करून नागरिकांना वेठीस धरले जात असून, आता तर चक्क तीन महिन्यांसाठी वाहतूक बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या भागातून सकाळी अत्यावश्यक असणार्या दूध वाहतूक करणांर्या गाड्या अॅम्ब्युलन्स शाळकरी मुले दवाखाना व सातारा बाजारपेठेत येणारे प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, हा नजीकचा मार्ग बंद झाल्यास दूध वाहतूक व आत्यवश्यक सेवा बंद होऊन स्थानिकांचे जीवनमान कोलमडेल व आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे भागातील दळणवळण सुरळीत चालण्यासाठी धरणाच्या बांधकामाशेजारूनच पर्यायी मार्ग काढून देण्याची मागणी होत आहे.
धरणामुळे बाधीत होणारा प्रमुख रस्ता धरणाच्या कामा अगोदर पूर्ण करून भागातील सर्वसामान्यांचे जीवनमान अडचणीत येणार नाही, याची दखल घेणे गरजेचे होते. तसे न होता वारंवार रस्ता बंद करून आम्हाला वेठीस धरले आहे. आता सर्वप्रथम कास धरणाशेजारूनच पर्यायी रस्ता तत्काळ निर्माण करा, अन्यथा रस्ता बंद केल्यास भागातून जनक्षोभ उसळून जनता रसत्यावर उतरेल.
- दिनकर जाधव, ग्रामस्थ, धावली.
कोरोनाचा लॉकडाऊन उठल्याने एक वर्षानंतर भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कास तलाव शेजारी प्रमुख रस्ता बंद केल्यास व वाहतूक कोळघर मार्गे वळवल्यास 20 किलोमीटरहून अधिक अंतर वाढत असल्याने नागरिकांना पेट्रोल डिझेलच्या महागाईत वेळेसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल व भागातील जनजीवन ठप्प होऊन पर्यटन व्यवसायही अडचणीत येईल. त्यामुळे कास येथूनच रस्ता पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.
- राजेंद्र सपकाळ, ग्रामस्थ, बामणोली.