sports

प्रशासनाच्या करड्या नजरेने मोरणा भाग हदरला

जन्नत पोईंटची झाली बत्ती गुल; मोकाट फिरणार्यावरती बसला चाप; दै. मूक्तागिरीच्या बातमीचा इफेक्ट

दै मुक्तागिरीने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा चांगलाचं इफेक्ट झाला असून मोकाट फिरणार्या युवकांवरती चांगलाचं चाप बसला आहे. गुरेघर धरणालगत असणार्या "जन्नत पोईंट" वरती अधिकार्यांच्या करड्या नजरेने आज दिवसभर मोरणा भागात स्मशान शांतता पसरली. सदर पोईंटजवळ फ्लेक्स चिकटवून व दिसणार्यांवरती कारवाई केल्याने लोकांमधून समाधान व्यक्त केले गेले.

गुरेघर धरणा लगत असणार्या पाण्या साठा खड्ड्यामध्ये गेली कित्येक महिने युवक पोहण्यासाठी येत आहेत. या खड्डा अत्यंत धोकादायक असून तिथे येतार्यांची संख्या आसपास च्या गावातील युवकांची नव्हे तर कराड, सातारा इथपासून येणार्यांची आहे. इथं किरकोळ दुखापती झालेल्या आहेत परंतू प्रशासना तील कोणाचेचं लक्ष नसल्याने इथं येणार्यांची संख्या वाढली आहे. बुधवारी बाहेरच्या मुलांच्या गाड्या पोहायला आल्याची खबर प्रशासनाला लागली. पाटण पोलिस स्टेशनचे तप्तर अधिकारी पोलिस निरिक्षक नितिन चौघंडे आणि आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही काळातचं मंडल अधिकारी ब्रम्हे याठिकाणी दाखल झाले. याठिकाणी आलेल्या युवकांनी तिथून पोबारा केला. त्यामुळे विनाकारण फिरणारे व आसपास असणार्यांवरती कारवाई करण्यात आली. दुपारच्या वेळी पाटणचे तहसिलदार योगेश्वर टोंपे याठिकाणी आले. त्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली व बँरिकेटस् लावून ते ठिकाण बंद करण्यास सांगितले. तसेच सदर ठिकाणी प्रतिबंधणात्मक कारवाई करण्याच्या अनुशंगाने फ्लेक्स लावण्यात आले. तद्नंतर रस्त्यावरुन येत असताना विनाकारण फिरणारे युवक व घोळका करून वायफळ बैठका घेणार्या लोकांवरती चांगलाच चाप बसवला. त्यामुळे पोलिस स्टेशनची व तहसिलदारांची गाडी दिसताचं काही रिकाम टेकड्यांची पळता भुई थोडी झाली. अधिकार्यांच्या या लवाजम्याने दिवसभर मोरगिरी मधील वातावरण गंभीर बनले होते. लोकांची वर्दळ नाहीशी झाली होती.