sports

पिंगळी खुर्दच्या सरपंचपदी लक्ष्मण जाधव तर उपसरपंचपदी शांताबाई आवळे यांची निवड


माण तालुक्यातील पिंगळी खुर्द गावच्या सरपंचपदी लक्ष्मण काशिनाथ जाधव तर उपसरपंचपदी शांताबाई शिवाजी आवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

दहिवडी : माण तालुक्यातील पिंगळी खुर्द गावच्या सरपंचपदी लक्ष्मण काशिनाथ जाधव तर उपसरपंचपदी शांताबाई शिवाजी आवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील पाटोदा, हिवरेबाजार आदी गावांप्रमाणेच पिंगळी खुर्द देखील ‘आदर्श गाव’ बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा निर्धार गावातील मतदार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. कोणत्याही राजकीय गटबाजीला बळी न पडता, पक्षाच्या बंधनात न अडकता संघटित होऊन गाव विकासाच्या वाटेवर नेण्याचा संकल्प नवनिर्वाचित सदस्यांनी केला आहे, त्याला गावकर्‍यांचा खंबीर पाठिंबा आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद शिंदे, शांताबाई जाधव, वर्षा शेलार, बाळासाहेब शेलार, कांचन काळे हे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. 

निवडणूक अधिकारी शिंगाडे, ग्रामसेवक सचिन खाडे यांनी सरपंच निवड प्रक्रिया पूर्ण केली.

नतून सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे दयानंद जाधव, हनुमंत जाधव, विठ्ठल काळे, दादा जाधव, नाना जाधव, पोलीस पाटील महेश शिंदे यांनी अभिनंदन केले. 

यावेळी पिंगळी खुर्द गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.