शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर 5 सप्टेंबरपासून 'Thank A Teacher' अभियान
माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची माहिती
समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत असते. आयुष्याच्या अशा वळणावर ज्या शिक्षकांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते. आपल्याला आवश्यक असेल अशा वेळी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केलेले असते. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व
सातारा : समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत असते. आयुष्याच्या अशा वळणावर ज्या शिक्षकांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते. आपल्याला आवश्यक असेल अशा वेळी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केलेले असते. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दि. 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभर "Thank A Teacher' अभियान राबवण्यात येणार असून, या अभियानांतर्गत दि. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त आपल्या आवडत्या शिक्षकाबद्दल समाजातील नागरिक, व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी, सर्व क्षेत्रांतील मान्यवर व समाजातील सर्वांनाच आपल्या जीवनात ज्या व्यक्तीला आपण गुरू मानतो त्यांच्याप्रति आपले मनोगत व्यक्त करण्याची किंवा भावना व्यक्त करण्याची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दै.‘मुक्तागिरी’शी बोलताना दिली.
या अभियानाविषयी अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी क्षीरसागर म्हणाले, ‘भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील व विविध राज्यांतील ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देऊ अतुलनीय कामगिरी केलेली असते, अशा सर्व शिक्षकांचा, गुरुजनांचा राष्ट्रीय पातळीवर भारताचे राष्ट्रपतींच्या हस्ते आणि राज्य पातळीवर ज्या-त्या राज्यांचे राज्यपाल यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. आपापल्या शिक्षकांच्या प्रति समाजातील प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी सर्व क्षेत्रांतील मान्यवर व समाजातील सर्वांनाच आपल्या जीवनात ज्या व्यक्तीला आपण गुरू मानतो त्यांच्याप्रति आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या आवडत्या शिक्षकाबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी 'Thank A Teacher' या अभियानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे.’
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कठीण व प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी शिक्षकांची नवीन कौशल्य, नवीन शैक्षणिक साधने वापरण्याची इच्छा दिसून येत आहे. शाळेमध्ये जाऊन शिकविणे यापलीकडे जाऊन आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षक मुलांना शैक्षणिक धडे व शिक्षण देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. ज्या ठिकाणी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, अशा सर्व ठिकाणी काही शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिक्षण ज्ञानदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यामध्ये जो आमूलाग्र बदल झालेला असतो किंवा जी सर्वांगीण प्रगती झालेली असते, ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी 'Thank A Teacher' हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. हे अभियान किंवा मोहीम फेसबुक हँडल- थँक्स टीचर, ट्विटर- थँक्स टीचर, इंस्टाग्राम- थँक्यू टीचर या सोशल मीडियाद्वारे राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये किंवा मोहिमेमध्ये समाजातील सर्व व घटकांचा सहभाग आवश्यक असून, त्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने पुढील उपक्रम सूचित करण्यात आलेले आहेत.
येत्या 5 सप्टेंबर 2020 रोजी 'Thank A Teacher' या अभियानासाठी किंवा मोहिमेसाठी आयोजित करण्यात आलेल्या कृती कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावादरम्यान या शैक्षणिक सत्रात शाळा बंद असल्या तरी विविध माध्यमातून उपक्रमातून मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असल्याचे व सतत धडपड करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. शिक्षकांच्या विविध उपक्रमांच्या यशोगाथा त्यांचे सादरीकरण केंद्र, तालुका तसेच जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.
कोविड-19 काळातील शिक्षणावर परिसंवादांंतर्गत शाळा बंद असल्या तरी वाडी, वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांच्या सोबत समाजातील काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करीत आहेत. अशा व्यक्तींचे वेबिनार तालुका पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत। यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा, प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धा अंतर्गत शिक्षक दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्यासाठी व पालकांच्यासाठी विविध प्रकारचे विषय देऊन ऑनलाईन वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्य, शब्द घेऊन कविता तयार करणे, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीत वाचन, नाट्यवाचन, अभिवाचन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.