sports

मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ यांची निवड


मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडुरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांना तहसीलदार राजेंद्र पोळ व मुख्याधिकारी अमोल पवार यांनी सहकार्य केले.

कुडाळ : मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडुरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांना तहसीलदार राजेंद्र पोळ व मुख्याधिकारी अमोल पवार यांनी सहकार्य केले.

ठरलेल्या कालखंडाप्रमाणे नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. 

नगराध्यक्ष पदासाठी विकास उर्फ पांडुरंग देशपांडे (भाजपा) व पांडुरंग जवळ (राष्ट्रवादी) यांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला प्रथमदर्शनी वेगळीच रंगत आली होती. मात्र, शिवसेनेचे नेते एस. एस. पार्टे, त्यांचे पाच नगरसेवक, उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, सुरेश पार्टे, नारायणराव शिंगटे, प्रकाश कदम, सचिन करंजेकर, सचिन जवळ, संजय सपकाळ, बापू जवळ, प्रवीण पवार यांच्यासह ज्येष्ठ मंडळींनी पांडुरंग जवळ यांच्या ज्येष्ठतेचा विचार करता त्यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्यामुळे जनमतानुसार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जवळ यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला. त्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांची साथ मिळाल्यामुळे पांडुरंग जवळ बिनविरोध निवडून आले.

मात्र, शेवटपर्यंत निवडणूक प्रक्रियेत असणार्‍या पांडुरंग उर्फ विकास देशपांडे यांनी ना. चंद्रकांत पाटील, आ. शिवेंद्रराजेंच्या आदेशामुळे आपण उमेदवारी मागे घेतली असल्याचे यावेळी जाहीर केले. तर सर्वांनी मिळून मला जी संधी दिली. त्या संधीच मी सर्वांना विश्‍वासात घेऊन सोनं करीन, असा विश्‍वास नवनिर्वाचित नगराध्यक्ष पांडुरंग जवळ यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एस. एस. पार्टे, मावळते नगराध्यक्ष अनिल शिंदे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी नगराध्यक्षा द्रौपदा मुकणे, सर्व पक्षाचे नगरसेवक, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, सुरेश पार्टे, नारायणराव शिंगटे, प्रकाश कदम, दत्तात्रय वारागडे, सचिन करंजेकर, सचिन जवळ, संजय सपकाळ, संतोष वारागडे, अंकुश सावंत, हौशा मुकणे, सदाशिव जवळ, बापू जवळ, विद्याधर भोसले, प्रकाश अवघडे, शामराव जवळ, रामभाऊ शेलार, मधुकर शेलार आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे बाबाराजेंनी अभिनंदन केले.


शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून दोन्ही पदासाठी एकही अर्ज दाखल न करता दोन्ही उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केल्यामुळेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे भविष्यात शिवसेनेच्या त्यागाचाही विचार वरिष्ठ नेते मंडळींनी केला पाहिजे, अशी सूचना यावेळी शिवसेनेचे क्षेत्रप्रमुख व ज्येष्ठ नेते एस. एस. पार्टे यांनी केली.