deshvidesh

आरोग्य विषयक माहिती देणारे ‘आरोग्य स्पंदन’ दर्जेदार, माहितीपूर्ण मासिक

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर : दिल्लीत माहूरकर यांच्या हस्ते प्रकाशन

Arogya Spandan is a quality, informative health information magazine
वाचकांना एकाच विषयावरील माहिती देणारे तसेच त्यांना सदृढ आरोग्याचा मंत्र देवून त्यांचे प्रबोधन करणारे आणि आरोग्य या एकाच विषयावर भाष्य करणारे ‘आरोग्य स्पंदन’ हे मासिक मराठी भाषिक वाचकांसाठी अत्यंत उपुयक्त असे आहे. यातील माहिती आणि आकर्षक मांडणीमुळे ते दर्जेदार व वाचनीय झालेले असून हे दर्जेदार मासिक हिंदी भाषेतूनही प्रकाशित केल्यास त्याचा असंख्य वाचकांना लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केले.

नवी दिल्ली : वाचकांना एकाच विषयावरील माहिती देणारे तसेच त्यांना सदृढ आरोग्याचा मंत्र देवून त्यांचे प्रबोधन करणारे आणि आरोग्य या एकाच विषयावर भाष्य करणारे ‘आरोग्य स्पंदन’ हे मासिक मराठी भाषिक वाचकांसाठी अत्यंत उपुयक्त असे आहे. यातील माहिती आणि आकर्षक मांडणीमुळे ते दर्जेदार व वाचनीय झालेले असून हे दर्जेदार मासिक हिंदी भाषेतूनही प्रकाशित केल्यास त्याचा असंख्य वाचकांना लाभ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केले.
दिल्ली येथील केंद्रीय माहिती आयुक्त कार्यालयात ‘आरोग्य स्पंदन’ मासिकाचे प्रकाशन आयुक्त उदय माहूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘आरोग्य स्पंदन’चे मुख्य संपादक सुदेश आर. भोसले, संपादक संग्राम निकाळजे यांची उपस्थिती होती. गेल्या 12 वर्षांपासून आरोग्य विषयक माहिती देणारे ‘आरोग्य स्पंदन’ मासिक आता नव्या रुपात प्रकाशित करण्यात येत असून नव्या स्वरुपातील ‘आरोग्य स्पंदन’ अंकाचे अवलोकन केल्यानंतर केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी हे मासिक दर्जेदार व माहितीपूर्ण असल्याचे सांगत ‘आरोग्य स्पंदन’ला शुभेच्छा व्यक्त केल्या.
मराठी भाषेत प्रकाशित होणाऱ्या ‘आरोग्य स्पंदन’ मधील मांडणी व माहितीपूर्ण लेख पाहता अशा प्रकारचे हे एकमेव मासिक असून वाचकांचा त्याला लाभत असलेला प्रतिसाद पाहता हेच मासिक हिंदीतून प्रकाशित केल्यास त्याचा बहुसंख्य वाचकांना लाभ होर्इल, अशीही भावना उदय माहूरकर यांनी व्यक्त केली. सध्या सोशल मिडिया व इतर माध्यमांमुळे माहितीचा खजिना खुला झालेला असला तरी अद्यापही लिखित स्वरुपातील माहितीवर वाचकांचा मोठा विश्‍वास असतो. त्यामुळे ‘आरोग्य स्पंदन’ची वाटचाल भविष्यात आणखी प्रगतीची भरारी घेर्इल, असे सांगत त्यांनी या वेगळ्या उपक्रमाबद्दल मुख्य संपादक सुदेश आर. भोसले, संपादक संग्राम निकाळजे यांचे अभिनंदनही केले.
यावेळी संपादक संग्राम निकाळजे यांनी ‘आरोग्य स्पंदन’च्या वाटचालीची माहिती दिल्यानंतर केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी  ‘आरोग्य स्पंदन’ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. मुख्य संपादक सुदेश भोसले यांनी आभार व्यक्त केले.