deshvidesh

न्यायाचा विजय झाला

 अयोध्या निकालावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रीया

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,  डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

 

मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,  डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, अयोध्येतील वादग्रस्त वास्तू बाबत जनतेच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला राग उफाळून आला. त्या वेळच्या काँग्रेस सरकारने लालकृष्ण अडवाणी, डॉ. जोशी, उमा भारती आदी नेत्यांवर खटले दाखल केले. वर्षांनुवर्षे हा खटला चालला. आता न्यायालयाने या सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. भारतीय जनता पार्टीने कायमच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे. या निकालाने न्यायाचा विजय झाला, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केले.