sports

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येचेे शेतकर्‍यांना निंबोळी अर्कविषयी मार्गदर्शन


भालवडी, ता. माण येथील शेतकर्‍यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अनुराधा शामराव बनसोडे हिने पाच टक्के निंबोळी अर्क कसे बनवायचे व निंबोळी अर्कचा वापर विविध पिकांवर कसा करावा, याचे शेतात प्रात्यक्षिक करून दाखवले

आसू : भालवडी, ता. माण येथील शेतकर्‍यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अनुराधा शामराव बनसोडे हिने पाच टक्के निंबोळी अर्क कसे बनवायचे व निंबोळी अर्कचा वापर विविध पिकांवर कसा करावा, याचे शेतात प्रात्यक्षिक करून दाखवले. 

महाविद्यालयाचे प्रा. डी. पी. बरकडे, डॉ. वाय. टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे  प्रात्यक्षिक पार पाडले. निंबोळी अर्क कसे तयार करावे, त्यासाठी लागणारे साहित्य, त्याचे प्रमाण किती द्यावे, या बाबतही शेतकर्‍यांना माहिती दिली.

कडुनिंबाच्या बियांमध्ये असलेले अझाडिरेक्टिन  पिकांवर  कीटकनाशकाचे काम करते, त्यामुळे याचा वापर सर्व प्रकारच्या पिकांवर 15 दिवसांच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास किडींच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडींचे नियंत्रण होते. तसेच 5 टक्के निंबोळी अर्क फवारल्याने मावा, अमेरिकन बोंडअळ्या तुडतुडे, पाने पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो, याबाबतही मार्गदर्शन केले. 

यावेळी जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर. अडत, डॉ. डी. एस. ठवरे, प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.