sports

अपहरण केलेल्या बालकाचा मृतदेह विहिरीत सापडला

फलटण तालुक्यातील काळज येथून अज्ञातांनी दुचाकीवरून केले होते अपहरण

गेली दोन दिवस अपहरण झाल्यानंतर तपासाचा थरार सुरू होता . त्याची अखेर मात्र वाईट झाली . अवघ्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिस त्या घटनेचा रात्र - दिवस शोध घेत होते .
फलटण तालुक्यातील पंढरपूर - पुणे पालखी मार्गावरील मोठ्या बाजारपेठेचे गाव असणाऱ्या काळज येथून मंगळवारी अपहरण झालेल्या १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने Iखळबळ उडाली आहे . गुरुवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले . गेली दोन दिवस अपहरण झाल्यानंतर तपासाचा थरार सुरू होता . त्याची अखेर मात्र वाईट झाली . अवघ्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समोर आल्यानंतर सातारा पोलिस त्या घटनेचा रात्र - दिवस शोध घेत होते . तपासासाठी तब्बल ८ पोलिसांचे पथक केले होते . आता मृतदेह सापडल्याने त्याचे अपहरण कोणी केले ? खून कोणी केला ? नेमके काय झाले ? असा सवाल उपस्थित झाला असून घटनेचे गूढ वाढले आहे . काखेत कळसा आणि गावाला वळसा या उक्तीप्रमाणे लोणंद पोलीसांनी जंग जंग अपहरणकर्त्याचा पिच्छा केला मात्र बाळाचा मृतदेह गावातीलच शेजारीच्या विहिरीत दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे . गेली दोन दिवस लोणंद सह सातारा पोलीस मोठे कष्ट घेत सिसीटीव्ही पुटेज मध्ये काळा शर्ट घालून दुचाकीवरून दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत होते . पण कोणाच्या ही मनात ही शंका आली नाही की बाळाचा तपास परिसरातच करावा .