sports

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहिवडी कडकडीत बंद


दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. 

दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. 

यावरती आज दहिवडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच आणखी दोन दिवस देखील बंद राहणार आहे. मागील काही दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. त्यातच एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन तसेच तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

जिल्ह्यात पहिल्यापासून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. मात्र, अचानक जानेवारी महिन्याच्या अखेरीस व फेब्रुवारीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने पुन्हा एकदा शहर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.