दहिवडी येथील प. म. शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा राजेंद्र यादव हिने राष्ट्रीय सीएससी गणित ऑलिंपियाड या परीक्षेत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
बिजवडी : दहिवडी येथील प. म. शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा राजेंद्र यादव हिने राष्ट्रीय सीएससी गणित ऑलिंपियाड या परीक्षेत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल तिला मोबाईल बक्षीस म्हणून मिळाला आहे. ही परीक्षा केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर ( सीएससी) तर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते.
अनुजा ही राजेंद्र यादव व सुनीता यादव या शिक्षक दाम्पत्याची कन्या आहे.
अनुजाच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण, पर्यवेक्षक नदाफ, जाधव तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले.
दरम्यान, अनुजाची नोबेल फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या एनएसटीएस परीक्षेतून इस्रोच्या सहलीसाठी ही निवड झाली आहे.