sports

फलटण तालुक्यातील आठ गावांत कंटेन्मेंट झोन जाहीर : डॉ. शिवाजीराव जगताप


‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांत दि. 2 ते 8 मे दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करून दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार/व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

फलटण : ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांत दि. 2 ते 8 मे दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करून दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार/व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या आदेशानुसार संपूर्ण फलटण शहर आणि तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, साखरवाडी,  वाठार निंबाळकर, वाखरी, जाधववाडी, विडणी आणि तरडगाव या 8 गावांतील प्रतिबंधित क्षेत्रात सर्व नियमांचे काटेकोर पालन आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात करण्यात आला असल्याचे निदर्शनास आणून देत कोणीही घराबाहेर न पडता घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जगताप यांंनी केले. 

प्रतिबंधित क्षेत्रात किराणा, दूध, फळे भाजीपाला घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून, त्यांच्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेने खास अधिकार्‍यांची वॉर्डनिहाय नियुक्ती केल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.

फलटण शहरात दि. 26 एप्रिल रोजी 66 कोरोना बाधित आणि 812 अ‍ॅक्टिव्ह दि. 27 रोजी 46 कोरोना बाधित आणि 778 अ‍ॅक्टिव्ह, दि. 28 एप्रिल रोजी 50 बाधित आणि 747 अ‍ॅक्टिव्ह, दि. 29 रोजी 52 बाधित आणि 792 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळल्याने आणि हे सर्व शहराच्या विविध भागांतील असल्याने जवळपास संपूर्ण शहरात रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण फलटण शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे तसेच तालुक्यातील वरील 8 गावांतही विविध भागात बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने सदर 8 गावांत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.