sports

शेनवडीच्या सरपंचपदी लीना कदम तर उपसरपंचपदी सचिन वाघमारे यांची निवड


शेनवडी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी लीना धनाजी कदम तर उपसरपंचपदी सचिन पांडुरंग वाघमारे यांची निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीची विशेष सभा पार पडली. यावेळी संबंधित निवडी करण्यात आल्या. 

वरकुटे-मलवडी : शेनवडी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी लीना धनाजी कदम तर उपसरपंचपदी सचिन पांडुरंग वाघमारे यांची निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीची विशेष सभा पार पडली. यावेळी संबंधित निवडी करण्यात आल्या. 

यावेळी सरपंच पदासाठी भाजपा व अपक्ष युतीच्या वतीने लीना धनाजी कदम यांनी अर्ज दाखल केला व त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधू सुरेश कदम  यांनी अर्ज दाखल केला होता. 9 पैकी 5 मते घेत लीना कदम सरपंचपदी विराजमान झाल्या. तर उपसरपंच पदासाठी भाजपा अपक्ष युतीकडून सचिन पांडुरंग वाघमारे यांनी अर्ज दाखल केला होता तसेच त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  हरिश्‍चंद्र खिलारी यांचा 9 पैकी 5 मते घेऊन पराभव करत उपसरपंच पदी विजयी झाले. 

यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य जयश्री कदम, मनीषा खिलारी, सूरज कदम, संजय खिलारी, नंदा खिलारी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. बी. शिंदे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक  शिवयोगी वंजारी यांनी सहकार्य केले. 

नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे भाजपा तालुकध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच मोहनशेठ कदम, माजी सरपंच  बाळकृष्ण खिलारी, विजयशेठ कदम, आप्पासो खिलारी, सचिन शिंदे, यशवंत पारसी, हरीश कदम, विठ्ठलशेठ कदम, सिद्धराम कदम, शहाजी खिलारी, आबासो बनसोडे, पोलीस पाटील संतोष खिलारी व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 
यावेळी बोलताना अपक्ष गटाचे नेते  धनाजी कदम म्हणाले, ‘शेनवडी गावच्या विकासासाठी अपक्ष किंवा भाजपा असा भेदभाव न करता भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करण्यासाठी वचनबद्ध आहे.’