sports

दहिवडीत नियम मोडणार्‍यांवर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करा

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना

सातारा जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता माण तालुक्यात दहिवडी शहरात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याने दहिवडी शहर आणी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तरी अजूनही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दहिवडी मधील जनतेनेदेखील घाबरून जाऊ नये. जर तशी काही लक्षणे दिसल्यास समोर या. स्वतःची तपासणी करून घ्या. कोणतीही लक्षणे लपवून ठेवू नका, याचा तुम्हालाच त्रास आहे. तपासणी करून प्रशासनला सहकार्य करा. अन् जर कोणी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना

दहिवडी : सातारा जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता माण तालुक्यात दहिवडी शहरात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त असल्याने दहिवडी शहर आणी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तरी अजूनही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दहिवडी मधील जनतेनेदेखील घाबरून जाऊ नये. जर तशी काही लक्षणे दिसल्यास समोर या. स्वतःची तपासणी करून घ्या. कोणतीही लक्षणे लपवून ठेवू नका, याचा तुम्हालाच त्रास आहे. तपासणी करून प्रशासनला सहकार्य करा. अन् जर कोणी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या. 

दहिवडी येथील कोरोनाबाधित भागाची जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व इतर अधिकारी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. तोंडावरती मास्क पाहिजे. कोणाशीही बोलताना मास्क नाकावरून खाली घेऊ नका. काही लोकांना सवय आहे. मास्क खाली घेऊन बोलायची, तसे करू नका. सवय बदला. माण तालुक्यातील बर्‍यापैकी शिक्षक हे म्हसवड आणि दहिवडी या ठिकाणी राहतात. आणि ग्रामीण भागात शाळेवर जातात; पण जर हे शिक्षक प्रतिबंधित क्षेत्रात राहत असतील तर त्यांना शाळेवर जाण्यास मनाई करा.’

आजपासून दहिवडीत कडक निर्बंध लागू केले आहेत. प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. दहिवडीतील जनतेने नियमांचे पालन करा. सूचना देऊनही नियम मोडणांर्‍यावर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. जशी जशी रुग्णसंख्या कमी होईल, तशी शिथिलता करण्यात येईल. जर रुग्णसंख्या वाढली तर अजून निर्बंध कडक करण्यात येथील म्हणून खबरदारी घ्या प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.