विधानसभा अध्यक्ष पटोले यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट
By esahas.com web team Sun 8th Nov 2020 03:02 pm
कराड: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज बाबांनी नानाभाऊंचे, खा श्रीनिवास पाटील व नानाभाऊंचे मित्र श्याम पांडे यांचे स्वागत केले. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस चे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, माजी शहर अध्यक्ष प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थित होते.