sports

माणसातला देवमाणूस...... प्रशासकिय सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी; कोविड सेंटरचं आपलं कुटुंब


पाटण तालुका आरोग्याच्या बाबतीत इतका मागास कसा राहिला? एक व्हँटिंलेटरचे अद्यावत हॉस्पिटल या तालुक्यात नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच जाणिवेतून पाटण ला तहसिलदार म्हणून रुजू झाल्यानंतर कोरोना रुग्णानां कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी आपला एक महिन्याचा पगार कोविड रुग्णांसाठी दिला. या गोष्टीमुळे पाटणवासीयांनी त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव केला.

मागील वर्षीपासून सुरु झालेला कोरोना तब्बल एक वर्ष झाले तरी आपलं बस्तान मांडून बसलेलाचं आहे. कोरोना काळामध्ये अनेकजन फुल ना फुलाची पाकळी समजून आपापल्या परिने मदत करत आहेत. पाटण च्या प्रशासकिय सेवेतील अधिकारी वर्ग आपलं शासकिय कामकाज सांभाळत कोरोना काळातही जोमाने काम करत आहे. कोरोना ग्रस्तांना सुखसूविधा देणं, त्यांना आँक्सिजन व इतर सेवा देणं तसेच आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन हे अधिकारी वर्ग काम करत आहेत. यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं आपलं काम आहे.

पाटणचे नव्याने रुजू झालेले तहसिलदार योगेश्वर नागनाथ टोंपे यांनी आपल्या अल्पावधीतचं कामामधून पाटण वासींयांचे मन जिंकून घेतले. मूळचे थडी सावरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड या ठिकाणचे आहेत. सर्वसामान्य कुटुंबामधून आलेले असून त्यांनी आपले शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड येथून केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे.

तहसिलदार म्हणून पाटण येथे पदभार स्विकारताना सर्वप्रथम तहसिल कार्यालयातील निकट गर्जा ओळखून त्यांची सुधारणा करुन घेतली. तहसिल कार्यालयीत मोडकळीस व बंद अवस्थेत असणार्या गोष्टी वापरात आणल्या. तद्नंतर खाण व्यावसायिकांचे धाबे चांगलेचं दणाणून सोडले. गौण खनिज बाबतीत तहसिलदारांची भूमिका सडेतोड आहे. त्यांच्या कारवाया जोमात सुरु आहेत. पाटण सारख्या ग्रामिण व दुर्गम भागामध्ये अद्यावत हॉस्पिटल अथवा व्हँटिंलेटर नाही म्हणून वेळकाळ न पाहता ते कोविडसाठी कार्य करत आहेत.

आँक्सिजन च्या सिलेंडर साठी व रुग्णाचा आँक्सिजन नाही म्हणून त्याचा जीव जाऊ नये. तसेच तालुक्यातून होता होईल तेवढे प्रयत्न करुन कोरोना हद्दपार करायचा आणि तालुका सुरक्षित ठेवायचा म्हणून ते स्वत: आपली टिम घेऊन सज्ज आहेत. सुट्टी दिवशी शासकिय गाडीचा वापर न करता आपल्या स्कूटर वरुन ये जा करत ते कार्यालयात येत जात असतात. कोणताही अधिकारी कार्यालयीन वेळेमध्ये विशिष्ट सीमारेषेपर्यंत काम करत असतो. परंतू अपवाद वगळता तहसिलदार टोम्पे हे मी तहसिलदार म्हणून इथं काम करत नाही तर मी या तालुक्यातील रहिवासी असून हे गाव, हा तालुका माझा असून ज्या प्रमाणे युवा वर्ग ज्या उत्साहाने काम करतो, जो हरहुन्नर पणा आणि काम करण्याची हुरुप असते ती मनी ठेऊन धडाडिने ते काम करत आहेत. पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी आपल्या कडक शिस्तीचा आणि काटेकोर नियमांचा खाक्या गतवर्षी दाखवून दिलाचं परंतू या वर्षी त्यांना स्वत: ला कोरोना होऊन देखील ते पाटणच्या रस्त्यावरती उतरुन दुकानदारांची पळताभूई थोडी केली. एकंदरीत महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन आणि आरोग्य कर्मचारी कोरोना मध्ये जीव ओतून काम करत आहेत आणि तालुक्यासाठी माझा तालुका माझी जबाबादारी म्हणून जबाबदारीने काम करत आहेत. कोविड सेंटर ला काम करत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर, नर्स, कर्मचारी उपस्थित आहेत. परंतू पाटणचे तलाठी म्हणून काम करणारे जयेश शिरोडे यांनी पूरपरिस्थितीमध्ये ही उभ्या पावसात जनतेच्या सेवेत होते आणि आत्ता ही ते स्वत: खुद्द कोरोना सेंटरला अगदी त्या रुग्णाच्या बाथरुम मध्ये जाऊन तिथलं लिकेज काढणे किंवा इतर किरकोळ काम तलाठी शिरोडे करत आहेत. पूरवठा विभागातील लक्ष्मण लुगडे व सर्व यंग ब्रिगेड हे चांगलीचं कंबर कसुन काम करत आहे. महसुल विभागाचे तुफान आलं या अशी दमदार कामगिरी सध्या तालुकाभर चर्चेमध्ये आहे.

  • रात्री अपरात्री कोविड सेंटरला भेट देणे असो किंवा सहज पाटण शहरात स्कूटर वरून रपेट मारत आपलं शहर सुरक्षित ठेवण्यासाठी यंग ब्रिगेडचे कँप्टन टोंपे कार्यरत आहेत. पाटण तालुक्यातील जनतेसाठी आँक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था करणं व तो येऊन येण्यासाठी खुद्द ते स्वत: जाऊन घेऊन आले. अश्या एक ना अनेक कामांमधून महसूल विभाग सध्या चांगलाचं जोमात आहे व लोकांच्या प्रशंसेस ही आहे.