sports

वडजल येथे क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांची जयंती उत्साहात साजरी


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणार्‍या, तसेच लोकमान्य टिळक, म. जोतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणार्‍या क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ वडजल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

म्हसवड : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणार्‍या, तसेच लोकमान्य टिळक, म. जोतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणार्‍या क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ वडजल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या हस्ते क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी दिलीप तुपे, वडजल गावचे ग्रामसेवक माळवे, पोलीस पाटील पोपट बनसोडे (पत्रकार), प्रमुख पाहुणे प्रा. बाळकृष्ण सकट, माजी सरपंच बजरंग वाघमारे, वंचित बहुजन आघाडी इंजिनिअर तालुका सरचिटणीस चंद्रकांत काटकर, इंजिनिअर ब्रह्मदेव काटकर, सनी तुपे, शंभूराज तुपे, सागर उर्फ बंटी तुपे, भाऊ माने, अक्षय तुपे, सागर तुपे, प्रवीण तुपे, दीपक काटकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हनुमंत काटकर, धनंजय जाधव, शकुंतला गुरव, प्रतिभा काटकर, महेंद्र वाघमारे, चेअरमन दशरथ काटकर, माजी सरपंच तुळशीराम काटकर, रामभाऊ काटकर, रंगराव काटकर, अण्णा मगर, दादासाहेब काटकर, भास्कर तुपे, धोंडिराम तुपे, शिवराज तुपे, आबा तुपे, भीमा तुपे, शिवा तुपे, मोहन तुपे, पोपट तुपे, विवेक तुपे, मारुती तुपे, संजीवन तुपे, त्र्यंबक कांबळे, महादेव तुपे, ज्ञानदेव तुपे, बाबासो तुपे, बजरंग पवार, चेतन तुपे, चुकू माने, पप्पू कांबळे, चंदर तुपे आदी व महिलांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.