लिंबखिंड, ता. सातारा येथे तिघांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सरताळे, ता. जावली येथील एका युवकाचा मृतदेह वाढे गावच्या हद्दीत काल सापडला होता. त्या युवकाच्या मृत्यूच्या तपासाची मागणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संजय वसंत साळुंखे, रा. सरताळे यांनी केली आहे.
येथील शनिवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एका केटरर्सची परप्रांतीय व्यक्तीने ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
कुडाळ, तालुका जावळी येथील स्वामी मंगल कार्यालयाच्या समोर उघड्या जागेमध्ये जुगार अड्डा चालवणाऱ्या सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 प्रमाणे तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
जुन्या भांडणाच्या कारणातून कोंडवे, ता. सातारा येथे गळा दाबून एकाला मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात असणाऱ्या तामजाई नगर येथील एका सोसायटी बाहेर महिला निघाली असताना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील ४६ हजार रुपयांचे दागिने हिसकावून ते चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला व बहिणीच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी सातारा येथील दोन जणांवर तालुका पोलीस सातारा ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
येथील गुरुवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एकाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच विनोद शिंदे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण तालुक्यातील गिरवी मधील स्वराज बंगल्याच्या खोल्यांची कुलपे तोडून पाच जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महाबळेश्वर येथे दिनांक 10 जानेवारी रोजी घरफोडीचा गुन्हा घडला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.