maharashtra

शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


येथील गुरुवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एकाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच विनोद शिंदे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील गुरुवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एकाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच विनोद शिंदे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१८ रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील गुरुवार पेठेत असणाऱ्या सिताराम अपार्टमेंटमध्ये इम्रान अल्ताफ शेख हे मोटारीने पाणी भरत असताना तेथीलच विनोद शिंदे हा त्या ठिकाणी दारू पिऊन आला. त्याने शेख यांची मोटर पाण्याच्या टाकीत टाकून त्यांना शिवीगाळ दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.