येथील शनिवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एका केटरर्सची परप्रांतीय व्यक्तीने ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील शनिवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एका केटरर्सची परप्रांतीय व्यक्तीने ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ जानेवारी रोजी ५.३० वाजता विकासकुमार खन्ना, रा. खुमला, जि. जालंदर (पंजाब) ही परप्रांतीय व्यक्ती सातारा येथील शनिवार पेठेत असणाऱ्या श्री मंगल सेवा येथे आली. त्याने केटरर्स उदय दामोदर गुजर यांना पोवई नाका येथील महालक्ष्मी मंदिरात महाप्रसाद आहे, असे सांगून त्यांच्याकडून ९० हजार रुपयांची ॲल्युमिनियमची भांडी भाड्याने घेऊन गेला. मात्र भांडी परत न करता त्याने फसवणूक केल्याची तक्रार उदय गुजर यांनी सातारा शहर पोलिसांनी दिली आहे. विकास कुमार खन्ना याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.


