सातारा शहर परिसरात असणाऱ्या तामजाई नगर येथील एका सोसायटी बाहेर महिला निघाली असताना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील ४६ हजार रुपयांचे दागिने हिसकावून ते चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात असणाऱ्या तामजाई नगर येथील एका सोसायटी बाहेर महिला निघाली असताना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील ४६ हजार रुपयांचे दागिने हिसकावून ते चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ रोजी ७.१५ वाजण्याच्या सुमारास तामजाई नगर येथील कोहिनूर सोसायटीमधून तेथेच वास्तव्य करणारी पूनम सचिन शिंदे ही महिला बाहेर पडत असताना तिच्याविरुद्ध बाजूने एक अज्ञात इसम आला. त्याने तिच्या गळ्यातील ४६ हजार रुपयांचे दागिने हिसकावून चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


