maharashtra

लिंबखिंड येथे तिघांना मारहाण  


लिंबखिंड, ता. सातारा येथे तिघांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : लिंबखिंड, ता. सातारा येथे तिघांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१८ जानेवारी रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास लिंबखिंड येथे सुनील संजय काळे रा. गेंडामाळ झोपडपट्टी, सातारा याला लिंबखिंड येथील जानू प्रकाश भोसले याने शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. हा वाद सोडवण्यासाठी काळे याची पत्नी जया आली असता तिलासुद्धा लाकडी दांडक्याने मारहाण केली.  काळे याची आई कमल हिला आकृती टेम्पो भोसले, काळ्या घाडगे यांनी दमदाटी केली तर कुसुम प्रकाश भोसले हिने हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.