दि. २३ जानेवारी ते दि. २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान उड्डाणपुलाच्या रॅम्प पोर्शनचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे धामणेर येथून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूक करता येणार नाही. हलक्या वजनांच्या वाहनांची वाहतूक पूर्ववत राहील. वरील कालावधीत या मार्गावरील वाहतूक नियमनामध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
ष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांच्या ललगुण, ता. खटाव येथील घरावर हॉटेल व्यवसायिक व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबियांनी हल्ला करून चारचाकी वाहनासह चिकन सेंटरची तोडफोड केल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
अपघातात जखमी झालेल्या एकाचा सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
जिल्ह्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी १२ हजार ३९० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
महिलांचा बचत गट तयार करून प्रत्येकी ३० हजार रुपये कर्ज देतो, असे सांगून कर्जाचे दीड लाख रुपये हडप केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फलटण शहर येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. दि. १३ रोजी हि घटना घडली.
कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील कुरेशी नगर मधील आझम कासम शेख, वय ५४ याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
सोनके (ता. कोरेगाव) येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील शाखांमध्ये संचालकांनी जवळील नातलगांच्या नावे बोगस कर्जवाटप केले. या प्रकारामुळे 12 कोटी 87 लाख 47 हजार 734 रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी 21 संचालकांवर वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाडळी तालुका कोरेगाव येथे घरफोडी करून 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल लांबवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी संजय अंकुश मदने राहणार वडूथ याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडील चोरी गेलेला मुद्देमाल 13 लाख 79 हजार आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन सहा लाख असा 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे.