जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास कठापुर, ता. कोरेगाव येथून तेथीलच अदिती मोहन केंजळे, वय २३ ही युवती महाविद्यालयात जाते असे सांगून राहत्या घरातून निघून गेली ती घरी परत न आल्याची तक्रार तिचे वडील मोहन केंजळे यांनी रहिमतपुर पोलीस ठाण्यात दिली. दुसऱ्या घटनेत याच दिवशी दि. १६ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास किरकसाल, ता. माण येथून विक्रम भाऊसो काटकर, वय ३३ हे घरात काही एक न सांगता निघून गेल्याची तक्रार त्यांचे वडील भाऊसो काटकर यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली. तिसऱ्या घटनेत दि. १७ रोजी १० वाजण्याच्या दरम्यान दहिवडी, ता. माण येथील ज्योती जगन्नाथ कुंभार, वय ३० ही महिला भांडी घासण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली, ती अद्याप परत न आल्याची तक्रार तिचे वडील जगन्नाथ कुंभार यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली.


