maharashtra

जिल्ह्यातील पाच दारू अड्डयांवर छापे


जिल्ह्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी १२ हजार ३९० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

सातारा : जिल्ह्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी १२ हजार ३९० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुठरे, ता. पाटण येथे तेथीलच बाबुराव आप्पाजी भिंगारदेवे हा घराच्या पाठीमागे बेकायदेशीरपणे दारू विकताना आढळून आला. त्याच्याकडून ७०० रूपये, पिंपरी, ता. कोरेगाव येथे पानपट्टीच्या मागे तेथीलच किरण भास्कर सगरे याच्याकडून ९१० रुपये, आनेवाडी - खर्शी रस्त्यालगत रायगाव गावच्या हद्दीत सुधीर शंकर भिसे रा. खर्शी याच्याकडून ३ हजार २९० रुपये, वहागाव, ता. कराड येथे तेथीलच गणेश शंकर कारणे याच्याकडून ७०० रुपये आणि मेढा, ता. जावली येथे तेथीलच आनंदा नारायण निकम याच्याकडून ६ हजार ७२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.