maharashtra

घरफोडीच्या प्रकरणातील आरोपीस अटक

19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पाडळी तालुका कोरेगाव येथे घरफोडी करून 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल लांबवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी संजय अंकुश मदने राहणार वडूथ याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडील चोरी गेलेला मुद्देमाल 13 लाख 79 हजार आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन सहा लाख असा 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे.

सातारा : पाडळी तालुका कोरेगाव येथे घरफोडी करून 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल लांबवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी संजय अंकुश मदने राहणार वडूथ याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडील चोरी गेलेला मुद्देमाल 13 लाख 79 हजार आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन सहा लाख असा 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे.
याबाबतची माहिती अशी दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता पाडळी, तालुका कोरेगाव येथे अज्ञात चोरट्याने घराशेजारी असणारे गोडाऊन फोडून त्यामधील पितळेच्या धातूंची झुंबरे, सिलिंग फॅन यांची चोरी करून नेले होते. त्यानुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून या संदर्भातील माहिती प्राप्त झाली. अभिलेखावरील आरोपी संजय अंकुश मदने हा घरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
गोडावून मधून चोरी केलेले 15 सिलिंग फॅन पैकी दोन सिलिंग फॅन हस्तगत करण्यात आले झुंबराचे साहित्य भंगार दुकानदारास विक्री केले ते साहित्य सुद्धा ताब्यात घेण्यात आले नमूद आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमित पाटील करत आहेत
या कारवाईमध्ये हवालदार उत्तम दबडे, संतोष पवार, संतोष सपकाळ, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, गणेश कापरे, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाने, शिवाजी गुरव यांनी भाग घेतला. या पथकाचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.