maharashtra

धामणेर येथील वाहतूक नियमनामध्ये बदल


दि. २३ जानेवारी ते दि. २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान उड्डाणपुलाच्या रॅम्प पोर्शनचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे धामणेर येथून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूक करता येणार नाही. हलक्या वजनांच्या वाहनांची वाहतूक पूर्ववत राहील. वरील कालावधीत या मार्गावरील वाहतूक नियमनामध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.

सातारा : धामणेर, ता. कोरेगाव येथील रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून दि. २३ जानेवारी ते दि. २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान उड्डाणपुलाच्या रॅम्प पोर्शनचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे धामणेर येथून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूक करता येणार नाही. हलक्या वजनांच्या वाहनांची वाहतूक पूर्ववत राहील. वरील कालावधीत या मार्गावरील वाहतूक नियमनामध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.
विटा मार्गे येणारी अवजड वाहने रहिमतपूर येथून कोरेगाव मार्गे सातारा येथे जातील. सातारा मार्गे येणारी अवजड वाहने सातारा- कोरेगाव - रहिमतपूर मार्गे विटा येथे जातील. वाहन चालकांना अन्य मार्गाचा वापर करावयाचा असल्यास ते तो करू शकतात. अवजड वाहनांची वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्यात येण्याबरोबरच त्या ठिकाणी बॅरॅकेट्स उभे करून दिवसा व रात्री कंपनीचे सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असून त्या ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी असल्याबाबत फलक लावण्यात येणार आहेत. सातारा येथील औद्योगिक वसाहत येथून मुख्यमार्गावर तसे फलक लावण्यात यावेत, धामणेर येथे रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाचे कामकाज सुरू आहे त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूस संबंधित कंपनीचे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कोणताही अडथळा येणार नाही याबाबत उपाययोजना करावी, ज्या ठिकाणी रस्त्याचे कामकाज सुरू आहे त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याची परिस्थिती समजून घ्यावी, याकरता दिशादर्शक फलक रेडियम बोर्डचा वापर करून लावण्यात यावेत, अशा सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.